‘त्या’ क्लिपमधील आवाज माझा नव्हेच, मंत्र्याचा मोठा खुलासा

‘त्या’ क्लिपमधील आवाज माझा नव्हेच, मंत्र्याचा मोठा खुलासा

राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा मुसंडी मारलेली असतानाच एक ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये राज्यात कोरोनाच्या वाढत्या केसेस पाहता खबरदारीच्या सूचना देण्यात येत आहे. पण ही ऑडिओ क्लिप महाविकास आघाडीतील एक प्रमुख खात्याच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या नावे सोशल मिडियात विशेषतः वॉट्स एपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. Be Alert, कामाला लागा अशा सूचना देतानाचा आवाज या ऑडिओ क्लिपमध्ये एकायला मिळत आहे. पण या ऑडिओ क्लिपवर खुलासा करताना त्या मंत्र्यांने क्लिपमधील आवाज माझा नसल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे या मंत्र्यांच्या नावे व्हायरल झालेली ऑडिओ क्लिपचे सत्य आता उघड झाले आहे.

महाविकास आघाडीतील महत्वाचे पद असणाऱ्या राजेश टोपे यांच्या नावे सध्या वॉट्स एपवर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक कधीही होऊ शकतो. त्यामुळे विभागीय आयुक्त असलेल्या सुनिल केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील यंत्रणेला सूचना दिल्याची ही ऑडिओ क्लिप आहे. पण या क्लिपमधील आवाज हा आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे असल्याचे नमुद करत ही क्लिप दिवसभरात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. अखेर त्या क्लिपमधील आवाज माझा नाही असा खुलासा करण्याची वेळ आरोग्यमंत्र्यांवर आली आहे.

First Published on: February 17, 2021 11:01 PM
Exit mobile version