मला बदनाम करण्यासाठीच हे कारस्थान – रक्षा खडसे

मला बदनाम करण्यासाठीच हे कारस्थान – रक्षा खडसे

मला बदनाम करण्यासाठीच हे कारस्थान - रक्षा खडसे

भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांच्या नावाखाली आक्षेपार्ह उल्लेख केल्याचे समोर आले. यानंतर याप्रकरणाबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेत भाजपला दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल, असा इशारा गृहमंत्र्यांनी दिला. या सर्व प्रकरणाबाबत खासदार रक्षा खडसे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. एका मराठी वृत्तवाहिनी बोलताना रक्षा खडसे म्हणाल्या की, ‘हे सर्व मला बदनाम करण्यासाठी केलं आहे. ‘

रक्षा खडसे नेमकं काय म्हणाल्या?

रक्षा खडसे म्हणाल्या की, ‘ज्यावेळेस मला याबाबत कळालं, त्यावेळेस मी वेबसाईट चेक केली. तर वेबसाईटवर असं काहीही नव्हतं. ज्या लोकांकडून हे व्हायरल झालेलं आहे, ते सेव्ह महाराष्ट्र फॉर्म बीजेपी या पेजवरून या गोष्टी व्हायरल होत आहे, असं मला वाटतंय. मला बदनाम करण्यासाठी हे फोटोशॉप करून केलं असेल अशी माझी शंका आहे. याबाबत मी रात्री सहाय्यक पोलीस आयुक्तांना कळवलं आहे. तसंच पक्षाला देखील सांगितलं आहे. आता याबाबत पुढे काय कारवाई होईल हे कळेलं.’

पुढे त्या म्हणाल्या की, ‘सोशल मीडियाचं जग एवढं मोठं झालेलं आहे आणि एवढं तंत्रज्ञान प्रगत झालं आहे. त्यामुळे एखादी खोटी गोष्ट पण खरी कशी करता येते, याच्या देखील यंत्रणा आपल्याकडे आहे. मला असं वाटतं की, या सर्व गोष्टी फोटोशॉपच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. कारण ज्या पेजवरून या सर्व गोष्टी व्हायरल होत आहेत, मुळात ही गोष्टी व्हायरल करण्यासारखी नाही आहे. पण त्यांनी ती व्हायरल केली आहे. मला बदनाम करण्यासाठी हे केलं असावं.’


हेही वाचा – भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर रक्षा खडसेंचा आक्षेपार्ह उल्लेख


 

First Published on: January 28, 2021 9:18 AM
Exit mobile version