घरताज्या घडामोडीभाजपच्या अधिकृत वेबसाईटवर रक्षा खडसेंचा आक्षेपार्ह उल्लेख

भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर रक्षा खडसेंचा आक्षेपार्ह उल्लेख

Subscribe

गृहमंत्री अनिल देशमुख यांना दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची केली मागणी

भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांच्या नावाखाली आक्षेपार्ह उल्लेख केल्याचे समोर आले आहे. पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी भाजपच्या अधिकृत वेबसाईटचा स्क्रीनशॉट ट्विटवर पोस्ट केला आहे. स्वाती चतुर्वेदी यांचे ट्विट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रिट्विट करून याप्रकरणातील दोषींवर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी भाजपकडे केली आहे. अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल, असा इशारा अनिल देशमुख यांनी दिला आहे.

दरम्यान पत्रकार स्वाती चतुर्वेदींनी भाजपच्या वेबसाईटचा स्क्रीनशॉट शेअर करत त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना ट्विटवर टॅग केलं आणि वेबसाईट कोण चालवतं?, असा सवाल स्वाती चतुर्वेदींनी केला. स्वाती चुतर्वेदींच्या याच ट्विटची दखल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेऊन दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

अनिल देशमुख यांनी ट्विटमध्ये असं लिहिलं आहे की, ‘भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे जी यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपने दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल.’

- Advertisement -

 

आता या मोठ्या वादानंतर भाजपच्या अधिकृत वेबसाईटवरील खासदार रक्षा खडसे यांच्या नावापुढील आक्षेपार्ह उल्लेख काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे ही तांत्रिक चूक होती? की कोणी जाणूनबुजून केलं होत? यांची चर्चा सध्या सुरू झाली आहे.


हेही वाचा – कर्नाटकव्याप्त वादग्रस्त भाग केंद्रशासित प्रदेश घोषित करा : मुख्यमंत्री


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -