मुंबईकरांना १ नोव्हेंबरपासून राणीच्या बागेत पुन्हा वाघ, पेंग्विन बघायला मिळणार

मुंबईकरांना १ नोव्हेंबरपासून राणीच्या बागेत पुन्हा वाघ, पेंग्विन बघायला मिळणार

मुंबईकरांना १ नोव्हेंबरपासून राणीच्या बागेत पुन्हा वाघ, पेंग्विन बघायला मिळणार

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राणी बागेचे दरवाजे पशु, पक्षी यांच्या संरक्षणासाठी व पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. मात्र आता कोरोनावर नियंत्रण आल्याने येत्या १ नोव्हेंबरपासून मुंबईकर, पर्यटकांना राणी बागेचे दरवाजे पुन्हा एकदा खुले होणार आहेत. पर्यटकांना वाघांची डरकाळी ऐकायला व पक्षांचा किलबिलाट, पाण्यात पोहणारे पेंग्विन बघायला मिळणार आहे. मात्र पर्यटकांना कोरोनासंदर्भातील सर्व नियमांचे पालन कडकपणे करावे लागणार आहे. तसेच, तिकीट विक्रीच्या वेळेत सव्वा तास कपात करण्यात येणार आहे. तर गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले ( ५ वर्षांखालील) यांनी शक्यतो राणीच्या बागेत भेट देणे टाळावे अथवा गर्दी न करता स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

कोविड – १९ संसर्ग कालावधीत बंद असलेले वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय सोमवार १ नोव्हेंबर २०२१ पासून नियमित वेळेनुसार पर्यटकांसाठी पुन्हा खुले करण्यात येणार आहे. पर्यटकांसाठी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तर प्रभातफेरीसाठी येणाऱया नागरिकांकरिता सकाळी ६ ते ८.३० वाजेपर्यंत प्राणिसंग्रहालय पुन्‍हा खुले करण्यात येणार आहे.

प्राणिसंग्रहालयातील तिकीट खिडकी सायंकाळी ५.१५ ऐवजी दररोज सायंकाळी ४ वाजता बंद करण्यात येणार आहे. दिवसभरात / सुटीच्‍या दिवशी कोणत्‍याही वेळेस प्राणिसंग्रहालयामध्‍ये जास्‍त प्रमाणात गर्दी झाली असल्‍याचे निदर्शनास आल्‍यास कोविड सुरक्षेच्‍या उपाययोजनांमुळे प्राणिसंग्रहालयाचे प्रवेशद्वार पर्यटकांकरिता त्वरित बंद करुन तिकिट विक्री थांबविण्यात येणार आहे.

कोविड-१९ च्या काळात नागरिकांनी घ्यावयाची दक्षता

 

First Published on: October 28, 2021 8:23 PM
Exit mobile version