दिव्यांग मतदारांसाठी मदत केंद्राचे लोकार्पण

दिव्यांग मतदारांसाठी मदत केंद्राचे लोकार्पण

दिव्यांग मतदारांसाठी आधुनिक यंत्रणा

मुंबई उपनगर जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना ‘लोकसभा निवडणूक- २०१९’मधील मतदान प्रक्रियेत सहभागी होणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी मतदानाच्या दिवशी म्हणजेच २९ एप्रिल रोजी दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत वाहन सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दिव्यांग मतदारांच्या अनुषंगाने त्यांची नावे नोंदणी करणे आणि आवश्यक ते समन्वयन साधण्यासाठी वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ‘दिव्यांग मतदार मदत केंद्राचे’ लोकार्पण झाले आहे. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या हस्ते ‘दिव्यांग मतदार मदत केंद्राचे’ लोकार्पण नुकतेच करण्यात आले आहे.

मतद केंद्र सुरू

निवडणूक आयोगाने यंदा निवडणुकीत दिव्यांग मतदारांचा लक्षात घेत. त्यांच्यासाठी “दिव्यांग मतदारांसाठी सुलभ निवडणूका” हे घोषवाक्य निश्चित केले आहे. तसेच त्यांच्यासाठी नवनविन योजना राबविण्यात येत आहेत. दिव्यांग मतदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनही तयारी सुरू केली आहे. याच तयारीचा भाग म्हणून मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘दिव्यांग मतदार मदत केंद्र’ सुरु करण्यात आले आहे. या केंद्रामार्फत दिव्यांग मतदारांशी संपर्क साधला जाणार आहे. तसेच दिव्यांग मतदार त्याच्या आवश्यकते नुसार केंद्राशी संपर्क साधू शकतात.

दिव्यांग मतदारांसाठी सुविधा

जिल्ह्यामध्ये यंदा दिव्यांग मतदारांची संख्या ४ हजारहून अधिक मतदारांना सुविधेचा लाभ घेता येणार आहे. दिव्यांग मतदारांशी संपर्क साधून त्यांना प्रशासना मार्फत मोफत वाहन सेवा उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच दिव्यांग मतदारांना शंका असल्यास त्यांचे निरसन करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहे. दिव्यांग मतदार ९८६९-५१५-९५२, ८६५५-२३५-७१४ आणि ०२२-२६५१-००२० या दुरध्वनी क्रमांक संपर्क साधण्यात येणार आहे. तसेच मोफत वाहन नोंदविण्यासाठी दिव्यांग मतदार किंवा त्याचे कुटुंबीय मतदारांचे नाव, मतदार क्रमांक आणि लोकसभा मतदार संघ क्रमांक आदी माहिती लघुसंदेशाद्वारे (SMS) किंवा व्हाट्सऍप संदेशाद्वारे ९८६९-५१५-९५२ किंवा ८६५५-२३५-७१४ या भ्रमणध्वनी क्रमांकावर पाठविल्यास वाहन नोंदणी केली जाणार आहे. तसेच मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांना त्यांच्या वाहनाचा क्रमांक त्याच्या भ्रमणध्वनीवर लघुसंदेशाद्वारे कळविला जाणार आहे.

मतदानांच्या दिवशी या सोयी मिळणार

दिव्यांग मतदारांना रांगेत उभे न राहता प्रवेश करू शकणार आहेत. त्यांची संख्या जास्त असल्यास स्वतंत्र रांग, अधिक प्रकाश व्यावस्था उपलब्ध असणार आहे. तसेच व्हील चेअर जाऊ शकेल असा मोठा दरवाजा असणार आहे. दिव्यांगांसाठी स्वतंत्र पार्किंग तसेच डोली आदी सुविधा देखील असणार आहेत. तसेच दिव्यांग मतदारांना अडचणी येऊ नये म्हणून अनेक जागृती मोहीमही राबविली जात आहे.

First Published on: April 13, 2019 7:15 PM
Exit mobile version