Jio चं नेटवर्क डाऊन; युजर्सकडून ट्विटरवर तक्रारींचा पूर

Jio चं नेटवर्क डाऊन;  युजर्सकडून ट्विटरवर तक्रारींचा पूर

Jio ची देशभरात हायस्पीड ब्रॉडबॅंड इंटरनेची सेवा, SES सोबत भागीदारीची घोषणा

भारतात रिलायन्स जिओच्या नेटवर्कमध्ये आज सकाळपासून अनेक अडचणी येत आहेत. अनेक युजर्संना त्यांच्या मोबाईलवर काही वेळा अचानक संपूर्ण नेटवर्क गायब झाल्याचे दिसून येतेय. मात्र याचा त्रास आता युजर्संनाच सहन करावा लागतोय. यामुळे अनेक युजर्संनी काही वेळ वाट पाहून आता तक्रारी सुरु केल्या आहेत. ट्विटरवर सध्या याबाबत अनेक तक्रारांच्या पोस्टचा पूर आल्याचे पाहायला मिळतेय. जिओचे नेटवर्क डाऊन झाल्याचे अनेक मेसेजही व्हायरल होत आहेत. दरम्यान काही तांत्रिक अडचणींमुळे नेटवर्क सेवेत अडचणी येत असल्याचे सांगण्यात येतेय. तसेच कंपनीने कर्मचारी दुरुस्तीचं काम सुरु असून लवकरचं ही सेवा सुरळीत सुरु होईल, असं सांगितले जात आहे.

अनेक युजर्स आता जिओ केअरच्या ऑफिशियल अकाऊंटला टॅक करुन ट्विट करत आहेत. दरम्यान जिओ नेटवर्क प्रोब्लेम असल्याने कॉलिंग आणि इंटरनेट सेवांवर परिणाम जाणवत आहे. अनेकांना मेसेज सेंडिंग आणि कॉलिंगमध्ये प्रोब्लेम येत असल्याचे म्हटले आहे. मुंबई, नवी मुंबई, आणि ठाणे या परिसरामध्ये जियोचं नेटवर्क बंद झाल्याचे दिसून येतयं. तर अनेकांचे नेटवर्क येत जात आहे.

सकाळी ८ वाजल्यापासून जिओचे नेटवर्क डाऊन होण्यास सुरुवात झालीय. त्यानंतर अनेक युजर्सनी ट्विटरवर आणि इतर सोशल मीडिया अकाऊंटवर जिओचं नेटवर्क गायब झाल्याचे सांगत आहे. तसेच युजर्सकडून कस्टमर केअरवर कॉल करुनही तक्रारी केल्या जात आहे. त्यानंतर जियोचे कर्मचारी दुरुस्तीच्या कामाला लागल्याचे सांगण्यात येतेय. मात्र जिओकडून यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Earthquake : जम्मू-काश्मीरपासून दिल्लीपर्यंत या भागात जाणवले भूकंपाचे धक्के



 

First Published on: February 5, 2022 2:35 PM
Exit mobile version