घरताज्या घडामोडीEarthquake : जम्मू-काश्मीरपासून दिल्लीपर्यंत या भागात जाणवले भूकंपाचे धक्के

Earthquake : जम्मू-काश्मीरपासून दिल्लीपर्यंत या भागात जाणवले भूकंपाचे धक्के

Subscribe

आज 5 फेब्रुवारीला शनिवारी सकाळी दिल्लीपासून जम्मू-काश्मीरपासून राजधानी दिल्लीपर्यंत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5.7 इतकी होती. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-एनसीआरसह देशातील मोठ्या भागात भूकंपाचे मोठ्या प्रमाणात धक्के जाणवले आहेत. भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान-ताजिकिस्तानच्या सीमेवर असल्याचे सांगण्यात येत आहे. लोक घाबरून घराबाहेर पडले.

आज 5 फेब्रुवारीला शनिवारी सकाळी दिल्लीपासून जम्मू-काश्मीरपासून राजधानी दिल्लीपर्यंत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5.7 इतकी होती. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-एनसीआरसह देशातील मोठ्या भागात भूकंपाचे मोठ्या प्रमाणात धक्के जाणवले आहेत. भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान-ताजिकिस्तानच्या सीमेवर असल्याचे सांगण्यात येत आहे. लोक घाबरून घराबाहेर पडले. या भूकंपात किती जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले याबाबत सध्या कोणतीही माहिती नाही. सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास भुकंपाचे धक्के जाणवले.

 

- Advertisement -


पाकिस्तानातील पेशावरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. एका वृत्तानुसार, इस्लामाबाद, रावळपिंडी आणि पंजाब आणि खैबर पख्तूनख्वामधील इतर अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. गेल्या महिन्यात अफगाणिस्तानच्या पश्चिमेला असलेल्या बदगीस प्रांतातही भूकंप झाला होता. या भूकंपामुळे २६ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

भारतात सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के जाणवले. तत्पूर्वी, गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ३.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. रापर गावात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. गांधीनगर स्थित इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मिक रिसर्च (ISR) ने सांगितले की, ‘शुक्रवारी सकाळी १०.१६ वाजता कच्छच्या रापरमध्ये ३.१ तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला. भूकंपाचा केंद्रबिंदू भूपृष्ठापासून १९.१ किमी खोलीवर होता.

दिल्ली आणि एनसीआरमध्ये ‘या’ भागात भूकंपाचे धक्के जाणवले

  • दिल्ली
  • नोएडा
  • ग्रेटर नोएडा
  • सोनपत
  • रेवाडी
  • पलवल
  • गुरुग्राम
  • फरीदाबाद
  • गाझियाबाद
  • हापूर

 


हे ही वाचा – Uttarpradesh : रामपूरमध्ये लग्न समारंभातून परतलेल्यांच्या गाडीला भीषण अपघात ; 5 जणांचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -