रेमडेसिवीरची खरेदी बाजारभावानेच, पालिकेला बदनाम करण्याचा डाव – आयुक्त चहल

रेमडेसिवीरची खरेदी बाजारभावानेच, पालिकेला बदनाम करण्याचा डाव – आयुक्त चहल

आगीत ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांचा आगीत होरपळून नाही तर श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू झाला. धुरात गुदमरल्यामुळे लोकांचा मृत्यू झाला असल्याचं आयुक्तांनी सांगितलं आहे.

मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या पाहता त्यांचे प्राण वाचविण्यासाठी पालिकेने रेमडेसिवीर इंजेक्शनची खरेदी ही बाजारभावानेच केली आहे, असा दावा मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केला आहे. पालिकेने रेमडेसिवीर इंजेक्शनची खरेदी तिप्पट दराने केल्याचा भाजपकडून करण्यात आलेला आरोप आयुक्तांनी फेटाळून लावला आहे. तसेच, पालिकेला या प्रकरणात उगाच बदनाम करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप आयुक्तांनी भाजपचे नाव न घेता केला आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना भाजपच्या नेत्यांकडून पालिकेच्या विविध त्रुटींवर, कोरोनाशी संबंधित साहित्य खरेदीसंदर्भात टीकाटिपणी सुरू आहे. याच अनुषंगाने, मुंबई महापालिकेने रेमडेसिवीर इंजेक्शनची खरेदी तिप्पट दराने केल्याचा आरोप भाजपतर्फे करण्यात आला आहे. त्याची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, विविध महापालिकेने रेमडेसिवीर केलेल्या खरेदीची यादीच जाहीर केली आहे. महापालिकेने प्रत्येक इंजेक्शन १ हजार ५६८ रुपयांनी खरेदी करत आहे. याच दरातील देशातील काही महानगर पालिकांसह राज्य सरकारांनी खरेदी केल्याचा दावा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केला आहे.

मुंबई महापालिका १ लाख ५६८ रुपये या दराने मुंबईकरांसाठी दोन लाख रेमडेसिवीर इंजेक्शनची खरेदी करीत आहे. त्यावर, भाजपचे स्थायी समिती सदस्य विनोद मिश्रा यांनी, हाफकीन इन्स्टीट्यूटने ६६५ रुपये दराने २० हजार इंजेक्शन खरेदी केल्याचा दावा करीत पालिका तिप्पट दरात रेमडेसीवर इंजेक्शनची खरेदी करीत असल्याचा आरोप आयुक्तांना पाठवलेल्या पत्राद्वारे केला असून याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मात्र पालिका आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन भाजपचे आरोप फेटाळून लावले आहेत. वास्तविक, हाफकीन इंस्टीट्यूटला सदर एवढ्या कमी दरात रेमडेसीवर इंजेक्शन मिळाले नाही, असा दावा केला आहे. तसेच, डदेशातील सुरत, नवी मुंबई, सुरत महापालिका , गुजरात मेडिकल सर्व्हिस कॉर्पोरेशन, वैद्यकिय शिक्षण आयुक्तालय मध्य प्रदेश,आसाम राज्य सरकार तसेच सातारा जिल्हा रुग्णालय या ठिकाणच्या प्रशासनाने रेमडेसीवर इंजेक्शनची खरेदी ही मुंबई महापालिकेने केलेल्या खरेदी दरानेच केली असल्याचा दावा मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केला आहे.

First Published on: April 15, 2021 9:37 PM
Exit mobile version