धनंजय मुंडे प्रकरणात पुरावे नष्ट होऊ शकतात – चित्रा वाघ

धनंजय मुंडे प्रकरणात पुरावे नष्ट होऊ शकतात – चित्रा वाघ

धनंजय मुंडे कॅबिनेट मंत्री असल्याने बलात्कार प्रकरणातील पिडिता आणि तिच्या कुटुंबीयांवर दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी व्हावी अशी अपेक्षा आहे असे मत मुंबई भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. आज राज्यात विविध ठिकाणी भाजपच्या महिला मोर्चामार्फत आंदोलन करण्यात आले. हे संपुर्ण प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे आहे. त्यामुळेच पोलिसांनी या प्रकरणातील सत्य समोर आणावे अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. आज सोमवारी आम्ही मुंबई पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचीही भेट घेतली असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात स्वतंत्र महिला एसीपीमार्फत चौकशी होईल असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणात सरकारनेही लक्ष घालण्याची गरज आहे. अन्यथा राज्यात वेगळा पायंडा पडू शकतो अशी शक्यता चित्रा वाघ यांनी व्यक्त केली आहे.

भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मागणी केली आहे की या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. हीच मागणी घेऊन आम्ही राज्यभरात आंदोलन केले असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणातील पिडित महिलेला सहानभूतीच्या चारही बाजू बंद झाल्या आहेत. या प्रकरणात महिलेवर आरोप करणारे दोषी असतील तर त्यांना शिक्षा व्हावी, तसेच रेणू शर्मा दोषी असेल तर तिलाही शिक्षा व्हावी असे मत वाघ यांनी व्यक्त केले. या प्रकरणात अजुनही एफआयर दाखल करण्यात आलेला नाही. या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच ब्लॅकमेल केल्याचे आरोप केले आहे. हे संपुर्ण प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे आहे. अत्याचार पिडितेच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलिसांनी या प्रकरणातील सत्य लवकरच समोर आणावे अशी मागणी वाघ यांनी केली आहे.


 

 

 

 

 

 

First Published on: January 18, 2021 6:20 PM
Exit mobile version