२४ तासात अहवाल द्या; पालिका आयुक्तांचे दक्षता विभागाला आदेश

२४ तासात अहवाल द्या; पालिका आयुक्तांचे दक्षता विभागाला आदेश

महापालिक आयुक्त अजॉय मेहता

सीएसएमटी पूल दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असतानाच त्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांनाही आज, शुक्रवारी सायंकाळपर्यंत घटनेची जबाबदारी निश्चित करण्यास सांगितले आहे. दरम्यान, महापालिकेनेही कडक पाऊल उचलतं मुख्य अभियंता (दक्षता) विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच २४ तासात प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देशही पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दिले आहेत. तसेच ऑडिट योग्य झालं होत का, दुरुस्ती सुचवली होती ती करण्यात आली होती का, जर झाली नसेल तर का झाली नाही, याबाबतचा तपशीलदेखील मागितला आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतली रुग्णांची भेट 

पूल दुर्घटनेत जखमी झालेल्यांची मुख्यंमंत्र्यांनी विचारपूस केली असून सेंटजॉर्ज रुग्णालयामधील दहा रुग्णांची त्यांनी भेट घेतली असून त्यातील एक रुग्ण आयसीयूमध्ये असून त्याची प्रकृत्ती स्थिर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, स्ट्रक्चरल ऑडिट होईनही अशा घटना घडणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हा पूल दुरुस्त असल्याचा शेरा दिला असताना पूल पडतोच कसा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या घटनेत दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले आहेत.

वाचा – पेंग्विनपेक्षा मुंबईतल्या माणसांची काळजी करा – नितेश राणे

वाचा – CSMT Bridge Collapse : सिग्नल होता म्हणून…

First Published on: March 15, 2019 1:25 PM
Exit mobile version