Mumbai Corona Update: दिलासा! गेल्या २४ तासात मृतांची संख्या घटली; ५७५ नवे रूग्ण, १४ जणांचा मृत्यू

Mumbai Corona Update: दिलासा! गेल्या २४ तासात मृतांची संख्या घटली; ५७५ नवे रूग्ण, १४ जणांचा मृत्यू

Mumbai Corona Update : कोरोनाच्या चौथ्या लाटेला निमंत्रण, मुंबईत एका दिवसात ९६१ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव आज वाढल्याचे दिसून आले आहे. सोमवारी मुंबईत ५२९ नव्या रूग्णांचे निदान करण्यात आले होते. मात्र हा आकडा आज वाढल्याचे समोर आले आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासात ५०० हून अधिक नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दिवसभरात १४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

आज मुंबईत ५७५ कोरोना बाधितांची नोंद करण्यात आल्याने आतापर्यंत हा कोरोनाबाधितांचा आकडा वाढून ७ लाख १७ हजार ६८३ वर पोहोचला आहे. तर गेल्या २४ तासात ७१८ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आतापर्यंत ६ लाख ८४ हजार ८२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत सध्या १५ हजार ३९० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे. तसेच १५ हजार ३९० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत ६६ लाख ४० हजार ६४१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये आज दिवसभरात २३ हजार ६८१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील कोरोना मुक्तीचा दर ९५ टक्क्यांवर आला आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण दुप्पटीचा दर ७०२ दिवसांवर गेला आहे. मुंबईत सक्रिय कंटेनमेंट झोनची संख्या १९ दिवसांवर आली आहे. मुंबईत मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ७ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. १० रुग्ण पुरुष व ४ रुग्ण महिला होते. १ रूग्णाचे वय ४० वर्षा खाली होते. ७ रुग्णांचे वय ६० वर्षावर होते. तर उर्वरित ६ रुग्ण ४० ते ६० वर्षांमधील होते.


लोकल लगेच नाहीच, मुंबईकरांना करावी लागणार वेटिंग

First Published on: June 15, 2021 8:49 PM
Exit mobile version