घरमुंबईलोकल लगेच नाहीच, मुंबईकरांना करावी लागणार वेटिंग

लोकल लगेच नाहीच, मुंबईकरांना करावी लागणार वेटिंग

Subscribe

पहिल्या टप्प्या आल्यानंतरच सेवा होणार सुरू, आपत्ती निवारण मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

मुंबईतील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. मुंबई अनलॉकमध्ये तिसर्‍या स्तरात असून आता सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. परंतु मुंबई सध्या तिसर्‍या स्तरात असून पहिल्या स्तरात आल्यावर लोकल प्रवासाबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे आपत्ती निवारण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. लोकल सुरू करायची असेल तर मुंबईकरांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना संपलेला नाही त्यामुळे काळजी घेतली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कोरोना संपलेला नाही. आजही १० हजार कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. रुग्ण बरी होण्याची संख्या ७ हजारच्या जवळपास आहे. रुग्ण बरी होण्याची संख्या वाढली होती आणि नव्या रुग्णांची संख्या कमी झाली होती; परंतु आता काही दिवसांमध्ये हे प्रमाण वाढते आहे. याचा अर्थ असा आहे की, पुन्हा काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

- Advertisement -

मुंबई अनलॉक स्तर-३ मध्ये आहे. अशा परिस्थितीत अत्यंत काळजी घेण्याची आवश्यकता आहे. परिस्थिती सुधारत आहे, परंतु लोकांच्या सुविधेसाठी अधिक परिस्थिती बिघडणार नाही याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. बस, बेस्ट सुविधा उपलब्ध आहे. रेल्वे बाबत परिस्थिती सुधारल्यास विचार करण्यात येईल. मुंबई स्तर १ मध्ये आल्यास रेल्वे सुरू करण्यात येईल. परंतु ३ स्तरात असल्यामुळे काही करता येत नाही.

आपला जिल्हा आपल्या हाती

जिल्ह्यातील एकूण परिस्थितीचा अभ्यास करून स्थानिक प्रशासनाने निर्बंध कमी करावेत, असे अधिकार देण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासनाला वाटत असेल त्यांचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला असेल तर ती त्यांची जबाबदारी असणार आहे. १ आठवड्यासाठी सुविधा दिल्या, परंतु पुन्हा कोरोना रुग्ण, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढल्यास मग ते पुन्हा निर्बंध लावणार आहेत, असे वडट्टीवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -