नारळाच्या झाडावर अडकलेल्या मांजराला वाचवण्यासाठी गेले आणि…

नारळाच्या झाडावर अडकलेल्या मांजराला वाचवण्यासाठी गेले आणि…

नारळाच्या झाडावर अडकलेल्या मांजराला वाचवण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाकडून गळफास घेणाच्या प्रयत्नात असणाऱ्या ३८ वर्षाच्या व्यक्तीला वाचवले, हा प्रकार ठाण्यातील लुईसवाडी येथे रविवारी रात्री समोर आला आहे. वागळे इस्टेट पोलिसांनी आत्महत्येच्या प्रयत्नात असणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.

असा घडला प्रकार

भूषण टिपणीस असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. भूषण हे ठाण्यातील लुईसवाडी येथील ओम आनंद सोसायटी या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहण्यास आहे. रविवारी रात्री ठाणे अग्निशमन दलाला गरोडिया अपार्टमेंट, लुईसवाडी येथील नारळाच्या झाडावर एक मांजर अडकली असल्याच्या कॉल आला होता. अग्निशमन दलाचे जवान मांजराला वाचवण्यासाठी निघाले लुईसवाडी येथे दाखल झाले. मांजराला झाडावरून खाली उतरवण्याचा प्रयत्न सुरु असतांना ओम आनंद सोसायटीतील रहिवाश्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना ओम आनंद सोसायटीत एक व्यक्ती पंख्याला दोर बांधून आत्महत्या करीत असल्याचे कळवले.

अग्निशमन दलाने लागलीच ओम आनंद सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर धाव घेऊन फ्लॅट क्रमांक २०३ मध्ये पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत असलेल्या भूषण टिपणीस (३८) यांना खाली उतरवून त्याच्या गळ्यातील फास काढून भूषण यांना वागळे इस्टेट पोलिसांच्या ताब्यात दिले. ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एकाचे प्राण वाचवल्यामुळे ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांचे कौतुक करण्यात येत आहे. आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भूषण टिपणीस यांना पोलिसानी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे.


देशात बाधितांची संख्या ६० लाखांपार; आतापर्यंत ९५,५४२ कोरोनाचे बळी
First Published on: September 28, 2020 12:15 PM
Exit mobile version