रियाचे ‘शुगर डॅडी’ महेश भट्टने रचला हत्येचा कट; सुशांतच्या जिम पार्टनरचा आरोप

रियाचे ‘शुगर डॅडी’ महेश भट्टने रचला हत्येचा कट; सुशांतच्या जिम पार्टनरचा आरोप

रिया महेश

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा फास रिया चक्रवर्तीच्या गळ्याभोवती दिवसेंदिवस घट्ट आवळला जात आहे. बिहार पोलिसांतील तक्रारीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी आणि आता सीबीआयकडून तपासाची शक्यता रियाला आणखीनच अडचणीत टाकणारी आहे. अशा परिस्थितीत सुशांतच्या कुटुंबिय तसेच मित्रमंडळीकडूनही वारंवार रियावर आरोप होत आहे. या प्रकरणी सुशांतचा जिम पार्टनर सुनील शुक्ला याने रियावर गंभीर आरोप केले आहेत.

सुशांतच्या केस प्रकरणी टाईम्स नाऊ वृत्तवाहिनीशी बोलताना सुनील शुक्ला यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे. त्यांनी सुशांतच्या हत्येचा कट ‘दोन डॅडी’मार्फत करण्यात आल्याचे म्हटले आहे. यापैकी एक रिया चक्रवर्तीचे जन्मदाते वडिल आणि दुसरे तिचे ‘शुगर डॅडी’ म्हणजे महेश भट्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रियाने तिच्या वडिलांमार्फत सुशांतला औषधांचा डोस दिला. तसेच रियाने त्याचे घर सोडल्यानंतर घरातील व्यक्तीने त्याला ते औषध दिले. त्या घरामध्ये सुशांतच्या वैतिरीक्त रुममेट सिद्धार्थ पिठानी, स्वयंपाकी नीरज आणि मॅनेजर दीपेश सावंत राहत होते. सुशांतच्या बाबत बोलताना सुनीलने म्हटले की सुशांतला कोणताही मानसिक आजार नव्हता. तो नेहमी जिममध्ये भेटत होता आणि व्यायामही करत होता. सुशांत हा मल्टिव्हिटॅमिन सप्लिमेंट घेत असल्याचेही सुनीलने म्हटले आहे.

हेही वाचा –

लॉकडाऊनमध्ये आते भावाकडून वारंवार लैंगिक अत्याचार; १६ वर्षीय मुलगी राहिली गरोदर

First Published on: August 24, 2020 3:35 PM
Exit mobile version