घरमहाराष्ट्रलॉकडाऊनमध्ये आते भावाकडून वारंवार लैंगिक अत्याचार; १६ वर्षीय मुलगी राहिली गरोदर

लॉकडाऊनमध्ये आते भावाकडून वारंवार लैंगिक अत्याचार; १६ वर्षीय मुलगी राहिली गरोदर

Subscribe

पुण्यात नात्यातील मुलानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लॉकडाऊनच्या काळात ३५ वर्षीय नराधमाने १६ वर्षाच्या मुलीवर वारंवार अत्याचार केल्याने ती १८ आठवड्याची गरोदर राहिल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण ऑगस्ट महिन्यात उघडकीस आले असून पोलिसांत याबाबत तक्रार नोंदवण्यात आली आहे.

त्या मुलीच्या आईने या घटनेबाबत पोलिसांत तक्रार नोंदवली आले. मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी लॉकडाऊनच्या काळात तिच्या आतेकडे राहत होती. या दरम्यान, सर्व प्रकारची वाहतूक सेवा पूर्णपणे बंद होती. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी आरोपी व त्याची पत्नी यांच्या व्यतिरीक्त घरातील इतर मंडळी गावी निघून गेली होती. मुलीने नुकतीच १० वीची परिक्षा दिली होती. त्यामुळे ती त्यांच्या घरात राहत होती. त्यांचे कुटुंबीय लॉकडाऊन असल्यामुळे वाहतुकीचा पर्याय नसल्याने पुन्हा पुण्यातील घरी येऊ शकत नव्हते. आरोपी हा मुलीच्या आतेचा मुलगा असून तो त्याच्या पत्नीसोबत पुण्यात राहत होता. माझी अल्पवयीन मुलगीदेखील त्यांच्यासोबत राहत होती, अशी माहिती त्या मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात दिली.

- Advertisement -

आरोपीची पत्नी नवऱ्यासोबत भांडण झाल्यामुळे माहेरी निघून गेली होती. त्यामुळे घरामध्ये आरोपी आणि पीडित मुलगी हे दोघेच राहत होते. १४ मार्च रोजी पहिल्यांदा त्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर वारंवर तो तिच्यावर अत्याचार करत राहिला. पीडितेला आई-वडिलांनी तिला घरी नेल्यानंतरच तिच्यावर अत्याचार होणे थांबले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालकांनी मुलीला ससून हॉस्पिटलमध्ये नेले असून पुढील वैद्यकिय प्रक्रिया सुरू आहेत. दरम्यान, त्या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा –

लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी चीनला खडसावले; म्हणाले, कारवाईचा पर्याय खुला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -