टाटा सन्सचे माजी संचालक आरके कृष्णकुमार यांचे निधन, मित्र गमावल्याची रतन टाटांची भावना

टाटा सन्सचे माजी संचालक आरके कृष्णकुमार यांचे निधन, मित्र गमावल्याची रतन टाटांची भावना

टाटा समूहाला उंचावर नेणारे आणि टाटा सन्सचे माजी संचालक आर. के. कृष्णकुमार यांचे रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कृष्णकुमार हे रतन टाटा यांच्या विश्वासू सहाय्यकांपैकी एक मानले जात होते. टाटा सन्सचे चेअरमन एमेरिटस रतन टाटा यांचे जवळचे सहकारी असलेले कृष्णकुमार हे टाटाच्या कन्सल्टन्सी फर्म, आरएनटी असोसिएट्स आणि समूहाच्या चॅरिटेबल ट्रस्टमध्ये गुंतलेले होते. ज्यामध्ये टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्समध्ये 66 टक्के हिस्सा आहे. (RK Krishnakumar Ratan Tata Trusted Aide And Former Tata Sons Director Passes Away)

माजी संचालक आर. के. कृष्णकुमार यांच्या निधनानंतर रतन टाटा यांनी शोक व्यक्त केला आहे. “माझे मित्र आणि सहकारी आर.के. कृष्णकुमार यांच्या निधनाने मला झालेली हानी शब्दात मांडता येणार नाही. आम्ही ग्रुपमध्ये आणि वैयक्तिकरित्या एकत्रित केलेला व्यवहार मला नेहमी लक्षात राहील. ते टाटा समूह आणि टाटा ट्रस्टचे खरे दिग्गज होते आणि सर्वांनाच त्यांची आठवण येईल”, अशा शब्दांत रतन टाटा यांनी शोक व्यक्त केला आहे.


हेही वाचा – मेक्सिकोमध्ये थरार! कारागृहावरील अज्ञातांच्या गोळीबारात 14 जणांचा मृत्यू, 24 कैदी फरार

First Published on: January 2, 2023 9:01 AM
Exit mobile version