Salman Khan Firing Case: सलमान खान गोळीबारप्रकरणी तिघांना पोलीस कोठडी; चौघांना मोक्का

Salman Khan Firing Case: सलमान खान गोळीबारप्रकरणी तिघांना पोलीस कोठडी; चौघांना मोक्का

मुंबई : सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराजवळील गोळीबारप्रकरणी विकीकुमार साहेबसाह गुप्ता, सागरकुमार जोगीउडर राऊत पाल आणि अनुजकुमार ओमप्रकाश थापन या तिघांना 8 मेपर्यंत पोलीस तर सोनूकुमार सुभाषचंद्र बिष्णोई याला वैद्यकीय कारणास्तव न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या चौघांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर चारही आरोपींना सोमवारी मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले होते. (Salman Khan shooting case three in police custody four arrested under MCOCA Act)

चौघांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई

14 एप्रिलला सलमान खान याच्या घराजवळ गोळीबार झाला. या गोळीबारानंतर दोन दिवसांनी गुन्हे शाखेच्या एका विशेष पथकाने सुरतच्या भूज शहरातून विकीकुमार सागरकुमार या दोघांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून इतर काही आरोपींची नावे समोर आली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात सोनूकुमार आणि अनुजकुमार या दोघांना पंजाब येथून अन्य एका पथकाने अटक केली होती. यातील विकीकुमार आणि सागरकुमार यांनी सलमान खान याच्या घरासमोर गोळीबार केला होता तर इतर दोघांनी गोळीबारासाठी त्यांना शस्त्रे पुरविल्याचे उघडकीस आले होते. याच गुन्ह्यांत शनिवारी गुन्हे शाखेने चारही आरोपीविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा – IPL Betting : बनावट अ‍ॅपद्वारे गडचिरोलीत आयपीएलवर सट्टेबाजी, चौघांना अटक

गुन्हा दाखल होताच सोमवारी चारही आरोपींना पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत अटक केली. अटकेनंतर या चौघांनाही पोलीस बंदोबस्तात मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्या. ए. एम पाटील यांनी विकीकुमार, सागरकुमार आणि अनुजकुमार या तिघांनाही सोमवार 8 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली तर वैद्यकीय कारणास्तव सोनूकुमारला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. (Salman Khan shooting case three in police custody four arrested under MCOCA Act)

सरकारी वकिल जयसिंग देसाई यांनी युक्तिवाद करुन आरोपींची पोलीस कोठडीची मागणी केली होती. या गुन्ह्यांत गॅगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिष्णोई हे दोघेही पोलिसांना हवे आहेत. लॉरेन्स हा साबरमती जेलमध्ये असून त्याचा लवकरच गुन्हे शाखेकडून ताबा घेतला जाणार आहे. अनमोल हा विदेशात वास्तव्यास असल्याने त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केली आहे. अनमोलच्या अटकेसाठी इंटरपोलच्या मदतीने भारताने प्रयत्न सुरू केले आहेत.

हेही वाचा – Vasai News: १६ जणांविरोधात बलात्कारासह पोक्सोचा गुन्हा


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

First Published on: April 29, 2024 10:28 PM
Exit mobile version