घरपालघरVasai News: १६ जणांविरोधात बलात्कारासह पोक्सोचा गुन्हा

Vasai News: १६ जणांविरोधात बलात्कारासह पोक्सोचा गुन्हा

Subscribe

या दोघांनी पिडीत मुलगी गरोदर राहिल्यावर तिला सोडून ते निघून गेले. त्यानंतर पिडीतेने जन्म दिलेल्या मुलीला जबरदस्तीने विक्रीसाठी देण्यात आल्याची गंभीर तक्रार पिडीतेने केली आहे.

वसईः एका अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी लग्नाचे आमिष दाखवून गर्भधारणा करून सोडून दिले. तसेच पिडीतेने जन्म दिलेल्या मुलीलाही विकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला असून पिडीतेच्या फिर्यादीवरून याप्रकरणी दोन महिला डॉक्टरांसह १६ जणांविरोधात आचोळे पोलीस ठाण्यात बलात्कार, पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नालासोपार्‍यातील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला २०२१ पासून लग्नाचे आमिष दाखवून महेंद्र सुतार आणि राहिल खान यांनी तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. या दोघांनी पिडीत मुलगी गरोदर राहिल्यावर तिला सोडून ते निघून गेले. त्यानंतर पिडीतेने जन्म दिलेल्या मुलीला जबरदस्तीने विक्रीसाठी देण्यात आल्याची गंभीर तक्रार पिडीतेने केली आहे. पिडीतेच्या तक्रारीवरून आचोळे पोलिसांनी १६ जणांविरोधात बलात्कार, पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून त्यात नालासोपारा येथील आर. के. हॉस्पीटलच्या डॉ. कल्पना वारंग, डॉ. दिपाली परमार आणि एका वकिलाचाही समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -