नॅशनल पार्कमधील ‘आनंद’ हरपला; वाघाचा कर्करोगाने मृत्यू

नॅशनल पार्कमधील ‘आनंद’ हरपला; वाघाचा कर्करोगाने मृत्यू

नॅशनल पार्कमधील 'आनंद' हरपला

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील १० वर्षाच्या ‘आनंद’ या वाघाचा आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्याला स्नायूंच्या कर्करोगासह इतर आजाराने ग्रासले होते आणि आज अखेर त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

आनंदच्या तब्येतीबद्दल माहिती देताना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने स्पष्ट केले आहे की, पलाश आणि बसंती या जोडप्यांपासून २०१० साली आनंदचा जन्म झाला होता. तेव्हापासूनच तो नॅशनल पार्क येथेच राहत होता. मात्र, काही दिवसांपासून त्याला स्नायूंच्या कर्करोगासह इतर काही रोगाने ग्रासले होते. त्याचे वजन देखील कमी झाले होते.

तसेच काही दिवसांपूर्वीच मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापकांकडून आणि तज्ञ मंडळीकडून आनंदची प्राथमिक चाचणी करण्यात आली होती. यामध्ये त्याला घातक ट्यूमर असल्याचे समोर आले होते, अशी माहिती डॉ. शैलेश पेठे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे रक्तचाचणीमध्ये आनंदचे क्रिएटिनाईन हे देखील वाढले होते. प्राण्यांचे क्रिएटिनाईन ५ ते ६ इतके असते, अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली होती. मात्र, ते आनंदचे २२ पर्यंत गेले होते. त्यामुळे त्याचे सर्व अवयव निकामी झाले होते. त्याच्यावर अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र, आज अखेर आनंदची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

यशचाही असाच झाला मृत्यू

आनंदचा भाऊ यश याचा देखील गेल्यावर्षी तसाच मृत्यू झाला होता. आनंद हा बंगाल टायगर प्रजातीचा वाघ होता.


हेही वाचा – विकास दुबेला विधानसभेच तिकिट मिळणार होत… संजय राऊत


First Published on: July 10, 2020 1:19 PM
Exit mobile version