घरताज्या घडामोडीविकास दुबेला विधानसभेच तिकिट मिळणार होत... संजय राऊत

विकास दुबेला विधानसभेच तिकिट मिळणार होत… संजय राऊत

Subscribe

विकास दुबे एन्काऊंटर नंतर राजकीय वर्तुळातून तसेच शहीदांंच्या कुटुंबीयांकडूनही अतिशय आक्रमक अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यामध्ये शिवसेना आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांकडून उत्तर प्रदेश सरकारच्या कारभारावर निशाणा साधण्यात आला आहे. एकंदरीतच राजकीय वरदहस्तामुळेच विकास दुबेला आपली गुन्हेगारी विश्वातली पाळमुळ घट्ट करता आली. पण त्यामागे असणारे राजकीय चेहरे हे एन्काऊंटरमुळे कायम स्वरूपीच झाकले गेले आहेत असाच सूर एकुणच एन्काऊंटरवर आलेल्या प्रतिक्रियांमधून येत आहे.

गुन्हेगारीच्या राजकारणाच उदाहरण म्हणजे विकास दुबे  

- Advertisement -

विकास दुबेसारखी जी लोकं निर्माण केली जातात ती अनेक राजकारण्यांची गरज असते. निवडणुका जिंकण्यासाठी, खंडणी गोळा करण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी असे लोक काही राज्यात पोलीस, राजकारणी तयार करतात. विकास दुबेही अनेक पक्षांशी संबंधित होता. याला राजकारण जबाबदार आहे. आधी राजकारणी गुन्हेगारांचा वापर करुन घेत होते. आता गुन्हेगार राजकारणात येत आहेत. गुन्हेगारीचं राजकारण होणं धोकादायक आहे. विकास दुबेला एक पक्ष विधानसभेचं तिकीट देणार होतं. पण तो सरेंडर झाला नाही म्हणून मिळालं नाही असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. त्या राज्याची प्रतिमा धुळीस मिळाल्यानंतर अशी कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही. समर्थन केलं नाही तरी पोलिसांचं खच्चीकरण होईल अशी भूमिका राजकीय पक्षाने घेऊ नये. बिहार, उत्तर प्रदेशात तर सब हमाम मै नंगे अशी परिस्थिती आहे.

विकास दुबेच एन्काऊंटर हा पोलिसांनी घेतलेला सूड असल्याचं सांगितलं आहे. संजय राऊत यांनी यावेळी चकमकीचं समर्थन केलं नाही तरी पोलिसांचं खच्चीकरण करणारी वक्तव्यं केली जाऊ नयेत असं आवाहन केलं आहे. मोठी नावं बाहेर येऊ नयेत यासाठी विकास दुबेला ठार केल्याच्या आरोपावर बोलताना संजय राऊत यांनी, मला असं वाटत नाही. आपल्या सहकाऱ्यांच्या मृत्यूचा पोलिसांनी घेतलेला हा सूड आहे असं म्हटलं. उत्तर प्रदेश किंवा योगींचा प्रश्न नाही. देशाच्या कोणत्याही राज्यात असं झालं तर पोलीस त्याला जिवंत सोडणार नाहीत. पोलीस आपल्या सहकाऱ्याच्या मृत्यूचा बदला नेहमी घेतं. जे झालंय त्याचं राजकारण होता कामा नये असे मत राऊत यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

गुन्ह्यांना संरक्षण देण्याच काय ? – प्रियंका गांधी

गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्ह्यांना संरक्षण देणाऱ्यांचे काय? असा सवाल प्रियंका गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे. त्याआधी प्रियंका गांधी यांनी विकास दुबेला मध्य प्रदेशच्या उज्जैनमधून अटक झाल्यानंतर त्यांनी योगी सरकारवर टिका करणारे टि्वट केले होते. “कानपूर हत्याकांडमध्ये उत्तर प्रदेश सरकारने प्रचंड अलर्ट राहून काम करणे अपेक्षित होते. पण ते अपयशी ठरले. अलर्ट असूनही आरोपी उज्जैनपर्यंत पोहोचला” असे प्रियंका गांधी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले होते.

माझ्या आत्म्याला समाधान – शहीद जितेंद्र पालचे वडिल

पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र पाल सिंह यांचा विकास दुबेकडून करण्यात आलेल्या गोळीबारात मृत्यू झाला होता. त्यांच्या वडिलांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “उत्तर प्रदेश पोलिसांचा मला अभिमान आहे. आज पोलिसांनी जे काही केलं आहे त्यामुळे माझ्या आत्म्याला समाधान मिळालं आहे. मी पोलीस प्रशासन आणि योगी सरकारचे आभार मानतो”. विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांनी ३ जुलै रोजी अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात आठ पोलीस कर्मचारी ठार झाले होते. यानंतर कुटुंबीयांकडून वारंवार आम्हाला न्याय द्या अशी मागणी केली जात आहे.

चौकशी व्हायला हवी होती – शहीद पोलिसाची पत्नी

मी समाधानी आहे. मात्र आता विकास दुबेला पाठींबा देणारे कोण आहेत हे कसं समोर येणार? त्याची चौकशी झाली असती तर ही माहिती मिळाली असती,” असं मत बिकरू गावत दुबेच्या गुंडांनी केलेल्या गोळीबारामध्ये शहीद झालेले पोलीस कर्मचारी सुल्तान सिंग यांच्या पत्नी उर्मिला वर्मा यांनी व्यक्त केलं आहे.

एक प्रतिक्रिया

  1. Hya Mawali Raut ne Sanjay Nirupan yanni tyanchyavar keleya aropanche uttar dyave..phaltu badbad karnyapeksha…swatahachya Mahavikas Aghadichya pakshatil leader nech directly arop kela ahe…

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -