Sushant Sucide Case: सुशांतसिंह आत्महत्येची चौकशी कशी होणार?, संजय निरुपम यांचा सवाल

Sushant Sucide Case: सुशांतसिंह आत्महत्येची चौकशी कशी होणार?, संजय निरुपम यांचा सवाल

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी चौकशीसाठी मुंबईत आलेल्या बिहारच्या पोलीस अधिकाऱ्यांना १५ दिवस गृह अलगीकरणात काढावे लागले तर घटनेची चौकशी कशी होणार?, असा सवाल मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्येची चौकशी करण्यासाठी विनय कुमार तिवारी हे आयपीएस अधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई महापालिकेने तिवारी यांना गृह अलगीकरण सांगितले आहे. या निर्णयावरून निरुपम यांनी मुंबई महापालिका आणि पोलिसांवर टीका केली आहे.

बिहार पोलीस अधिकाऱ्यांना १५ ऑगस्टपर्यंत गृह अलगीकरण सांगितले आहे. त्यामुळे चौकशी कशी होणार? असा सवाल करत निरुपम यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती सोमवारी ट्विटद्वारे केली आहे. तिवारींना गृह अलगीकरणातून मुक्त करावे आणि तपासाला मदत करावी. अन्यथा मुंबई पोलिसांवर संशय वाढेल, असे निरुपम यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या नियमावलीनुसार बिहार पोलिसांना गृह अलगीकरण करण्यास सांगण्यात आल्याचा खुलासा मुंबई महापालिकेने केला आहे. गृह अलगीकरणातून सूट हवी असेल तर बिहार पोलिसांनी सक्षम प्राधिकाऱ्याकडे अर्ज करावा, असेही महापालिकेने म्हटले आहे.


हेही वाचा – आत्महत्येपूर्वी सुशांतने Google वर सर्च केलं होतं Painless Death किवर्ड


 

First Published on: August 3, 2020 7:13 PM
Exit mobile version