सीता, रावणाच्या राज्यात पेट्रोल स्वस्त, राम राज्यात महाग का? – संजय राऊत

सीता, रावणाच्या राज्यात पेट्रोल स्वस्त, राम राज्यात महाग का? – संजय राऊत

राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर बोचरी टीका करत रामराज्यात इंधन महाग का असा प्रश्न उपस्थित केला आहे. मागील महिन्यापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. देशातील जनतेचे महागाईपासून संरक्षण करणे हे सरकारचे काम आहे. सरकार व्यापाऱ्या सारखे बसलेलं नाही आहे. हे रामाचे राज्य आहे. तसेच राम राज्यात पेट्रोल डिझेल महाग का असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. पेट्रोल-डिझेलचे वाढती महागाई हे धर्मसंकट असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी म्हटले होते यावरीही संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

पेट्रोल डिझेलच्या किंमती कधी कमी होतील हे आपल्याला सांगता येणार नाही असं सीतारामन यांनी म्हटलंय तसेच इंधनच्या वाढलेल्या किंमती या धर्मसंकट असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याचा संजय राऊत यांनी चांगलाच निशाणा साधला आहे. इंधन दरवाढीचा मोठा प्रश्न युपीए सरकार समोरही होता. परंतु त्या सरकारने कधी धर्मसंकट असल्याचे म्हटले नाही. मनमोहनसिंग यांनी नेहमी इंधन दरवाढ विरोधात लढण्यासाठी नेहमी प्रयत्न केले आहेत. परंतु आताचे सरकार पळ काढत आहे. त्यामुळे अशा अर्थमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. जे या समस्येला धर्मसंकट सांगून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहेत. असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.


हेही वाचा : ‘गरज सरो, पटेल मरो’ स्टेडियमच्या नामांतरावरुन भाजपवर शिवसेनेची टीका


शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुढे म्हटले आहे की, हे रामराज्य आहे परंतु राम राज्यापेक्षा रावण राज्य म्हणजे श्रीलंका आणि सीता राज्यात म्हणजे नेपाळमध्ये आपल्यापेक्षा ४० टक्क्यांनी पेट्रोल डिझेलचे दर कमी आहेत. मग रामराज्यात इंधन महाग का? असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

First Published on: February 26, 2021 11:36 AM
Exit mobile version