नरेंद्र मोदींना आम्ही नेते मानतो – संजय राऊत

नरेंद्र मोदींना आम्ही नेते मानतो – संजय राऊत

नोटबंदीच्या काळात रांगेत लोकांचा मृत्यू झाला. तर आता लसीसाठी रांगेत उभे करून मारण्याचा प्रयत्न केंद्राकडून केला जातोय. कोरोना विरोधातील युद्ध हा शब्द पंतप्रधानांकडूनच वापरण्यात आला होता. पण आता या युद्धामध्ये राजकारण आणल जात असल्याची टीका शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केली. भाजपला आम्ही आजही सहकारी मानतो. भाजप काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये होते. भाजपसोबत आमचे राज्यात वैचारिक मतभेद आहेत. पण आजही नरेंद्र मोदींना आम्ही नेते मानतो. महाराष्ट्रात वैचारिक मतभेद असले तरीही भाजपसोबत मतभेद नाहीत. कारण हा शेवटी महाराष्ट्राचा प्रश्न असल्यानेच मतभेद मिटवून महाराष्ट्राचे प्रश्न सोडवायला हवेत, असे आवाहन संजय राऊत यांनी केले. कारण शेवटी हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे. म्हणूनच कोरोना विरोधातील लढाईत लस पुरवठ्यावर राजकारण न करता लोकांचा प्रश्न सुटायला हवा असेही आवाहन त्यांनी केले. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

गुजरातमधील सध्याची कोरोना हाताळण्याची परिस्थिती पाहता, त्याठिकाणी कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. पण तुलनेत महाराष्ट्राने कोरोनाची परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. महाराष्ट्राला कोरोना डोस देताना मात्र गुजरातपेक्षा कमी डोस दिल्याचे चित्र आहे. म्हणूनच कोरोना डोस देण्यावरून आता राजकारण सुरू झाल्याचे दिसत आहे. खुद्द आरोग्यमंत्री हे त्यांच्या मंत्रालयाची जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळत आहेत. पण आऱोग्यमंत्र्यांमधील राजकारणी उफाळून येत असल्याची टीका त्यांनी केली. तर दुसरीकडे महाराष्ट्रातीलच मंत्री असलेले प्रकाश जावडेकर हे महाराष्ट्राच्या विरोधातील वकीली केंद्रात बसून करतात असेही राऊत म्हणाले.

केंद्रीय यंत्रणांचा वापर करून सध्या महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न हा भाजपकडून होत आहे. पण महाराष्ट्राला जे लोक डिवचले, त्यांच्याविरोधात महाराष्ट्र उलटला हा ७० वर्षांचा इतिहास आहे. सध्या अनेक कारवाया केंद्रीय यंत्रणांचा वापर करून महाराष्ट्राविरोधात होत आहेत. त्यामुळेच शिवसेना सत्तेत असण महत्वाच नाही, संघटनेच मजबुतीकरण हेच उदिष्ट शिवसेनेने कायम ठेवले आहे.


 

First Published on: April 9, 2021 3:32 PM
Exit mobile version