उर्मिला मातोंडकर यांची विधानपरिषदेवर नियुक्ती?; संजय राऊत यांचे सूचक वक्तव्य

उर्मिला मातोंडकर यांची विधानपरिषदेवर नियुक्ती?; संजय राऊत यांचे सूचक वक्तव्य

राज्यात सध्या विधानपरिषेवरील नियुक्त्यांच्या चर्चांना उधाण आले आहे. राज्यपाल नियुक्त कोट्यातून शिवसेनेच्या तिकिटावर उर्मिला मातोंडकर यांना आमदारकी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र त्यांच्या नियुक्तीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सूचक वक्तव्य करत उर्मिला मातोंडकर यांचा विषय हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित येत असून हा कॅबिनेटचा निर्णय असणार आहे. त्यावर मुख्यमंत्री स्वतः निर्णय घेतील, असे म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरून उर्मिला मातोंडकर यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी उर्मिलाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतली, असे सांगत या विषयावर अधिक बोलणे टाळले.

उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसच्या तिकीटावर गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा भाजप नेते गोपाळ शेट्टी यांच्याकडून पराभव झाला होता. आता उर्मिला मातोंडकर यांची विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त जागेवर शिवसेनेकडून नियुक्ती होण्याची शक्यता असल्याने त्या पुन्हा एकदा राजकीय चर्चेत आल्या आहेत. उर्मिला यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर शिवसेनेशी त्यांची जवळीक वाढली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन उर्मिला मातोंडकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर शिवसेनेकडून उर्मिला यांची विधीमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे संसदेत जाता-जाता राहिलेल्या उर्मिला विधीमंडळात प्रवेश करणार का, याची उत्सुकता आहे.

हेही वाचा –

PUBG Mobile: भारतात आजपासून PUBG गेमवर बंदी, कंपनीने केला खुलासा

First Published on: October 30, 2020 11:15 AM
Exit mobile version