मुंबईतील गणेशोत्सवाबाबत घेण्यात आला ‘हा’ निर्णय

मुंबईतील गणेशोत्सवाबाबत घेण्यात आला ‘हा’ निर्णय

गणेशोत्सव सण

मे महिन्याला सुरुवात झाली का चाकरमान्यांची लगबग असते ती गावी जाण्याची. मात्र, यंदा देशावर आलेल्या कोरोनामुळे गावी जाणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. दरम्यान, आता लोकांना चाहूल लागली आहे ती गणेशोत्सवाची. कारण दोन महिन्यावर गणेशोत्सव सण आला आहे. त्यामुळे गणपतीच्या मूर्त्यांपासून ते सर्व सजावटीपर्यंतच्या कल्पना अनेकांच्या डोक्यात सुरु आहेत. पण, जगभर विळखा घालणाऱ्या कोरोनामुळे चित्र काहीसे वेगळे दिसत आहे.

हा आहे निर्णय

कोराना व्हायरसमुळे गणेशोत्सव साजरा करता येणार की नाही, असा प्रश्न चिमुरड्यांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच सतावत आहे. त्यातच आता मुंबईतील गणेशोत्सवाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असले तरीही हा उत्सव साजरा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. उत्सव साजरा करण्याच्या या निर्णयावर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती ठाम असल्याची माहिती zee २४ तास या वृत्तवाहिनीने दिली आहे. मुख्य म्हणजे उत्सव साजरा होणार असला तरीही त्यामध्ये अत्यंत साधेपणा जपला जाणार आहे. ही बाब मात्र अधोरेखित करण्यात आली आहे.

सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा करावा. प्लेगच्या साथी दरम्यान, देखील अगदी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. तसेच मुंबई शहरासमोर कोणतेही मोठे संकट आले. तेव्हा प्रत्येक वेळी मंडळांकडून सामाजिक भान जपण्यात आले आहे. गणेशोत्सवा दरम्यान होणारी गर्दी आणि त्यातून कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका पाहता भाविक आणि कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही.  – नरेश दहिबावकर; बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ


हेही वाचा – ऑनलाईन घ्यायला गेला आलू भुजिया शेव, बसला २.२५ लाखांचा झटका!


First Published on: May 4, 2020 1:06 PM
Exit mobile version