मनसेचा नवीन झेंडा दोघांनीच बनवला, एक राज ठाकरे आणि दुसरा ‘तो’!

मनसेचा नवीन झेंडा दोघांनीच बनवला, एक राज ठाकरे आणि दुसरा ‘तो’!

मनसे

सध्या सगळीकडे चर्चा आहे ती मनसेच्या बदललेल्या झेंड्याची. गोरेगाव येथील मनसेच्या महाअधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या मनातील नव्या झेंड्याचे अनावरण केले आणि सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली. पण हा झेंडा बनवण्यामागे दोन व्यक्तींची विशेष मेहनत होती. एक म्हणजे खुद्द राज ठाकरे आणि दुसरे म्हणजे ज्यांनी हा झेंडा आकारास आणला ते सौरभ करंदीकर. एखादी गोष्ट करायची तर ती विचारपूर्वक आणि लोकांना पटेल अशीच करायची ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची खासियत. हा झेंडा पूर्ण होईपर्यंत राज ठाकरे यांचे कामावर बारकाईने लक्ष होते आणि यासाठी त्यांनी स्वतःच मार्गदर्शन केले. मनात असलेला झेंडा लोकांसमोर चांगल्या पद्धतीने यावा यासाठी राज ठाकरे करंदीकर यांना मार्गदर्शन करत होते.

करंदीकर जे. जे. स्कूलचे विद्यार्थी

जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकलेल्या करंदीकर यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या मनातला झेंडा सांगितला आणि त्यानंतर सुरू झाले खऱ्या अर्थाने या झेंड्यावर काम! मूळ कलाकार असलेल्या राज ठाकरे यांच्या पक्षाचा झेंडा उत्तम कसा होईल? याचे आव्हान करंदीकर यांच्याकडे होते. हा झेंडा बनवताना त्यामध्ये काटेकोरपणा आणण्याकडे राज ठाकरे यांचा विशेष भर होता, असं करंदीकर सांगतात.

मला साहेबांनी त्यांच्या मनातील झेंडा सांगितला. एखादी गोष्ट पूर्ण करायची असेल तर त्यामध्ये अनेक पायऱ्या असतात. तसेच या झेंड्याच्या बाबतीत झाले. राज ठाकरे यांना मी प्रत्येक पायरीच्या वेळी विचारत होतो. ही खूप मोठी प्रक्रिया होती. साहेबांनी प्रत्येक वेळी त्यामध्ये बदल सुचवले आणि त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाने हा झेंडा रेखाटला गेला. झेंडा तयार होत असताना मी आणि राज साहेब असे दोघेच असायचो. साहेब जसे जसे सांगत गेले तसा झेंडा तयार झाला.

सौरभ करंदीकर, मनसे झेंड्याचे डिझायनर


हेही वाचा – राज ठाकरेंची नवी घोषणा; चर्चा एका झेंड्याची, पण मनसेचे आता २ झेंडे!
First Published on: January 24, 2020 10:43 PM
Exit mobile version