Mucormycosis: म्युकरमायकोसिस रुग्णांच्या मदतीसाठी शाळकरी मुलं आली धावून

Mucormycosis: म्युकरमायकोसिस रुग्णांच्या मदतीसाठी शाळकरी मुलं आली धावून

Mucormycosis: म्युकरमायकोसिस रुग्णांच्या मदतीसाठी शाळकरी मुलं आली धावून

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह संपूर्ण देशात थैमान घातले आहे. यादरम्यान म्युकरमायकोसिसच्या (Mucormycosis) रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. यामुळे मुंबईतील फोर्ट येथील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल (Cathedral and John Connon School) मधील मुलं म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. दोन शाळकरी मुलांनी पुढाकार घेऊन म्युकरमायकोसिस रुग्णांच्या उपचारासाठी पैसे गोळा करत आहेत.

म्युकरमायकोसिस हा एक दुर्मिळ आणि गंभीर आजार आहे. यावर वेळीच उपचार घेतले नाहीतर अंधत्व येणे, अवयव बिघडणे, शरीरातील ऊतींचे नुकसान होते असे घडते. तसेच महत्त्वाचे म्हणजे वेळीच उपचार न केल्यास काही वेळा जीवावर देखील बेतू शकते. फेब्रुवारी महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर १६० हून अधिक कोरोनामुक्त रुग्णांमध्ये मुंबईत म्युकरमायकोसिस आढळला. यामधील २० जणांचा मृत्यू झाला आहे. याच अनुषंगाने म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने इयत्ता १०वी मधील दोन विद्यार्थी पुढे आले आहेत. यामधील एका विद्यार्थ्याचे नाव अर्णव गुप्ता असून दुसऱ्याचे नाव राणाई लूनकर असून दोघेचे वय १५ आहे. गेल्या एका आठवड्यात या दोघांनी इम्पॅक्टगुरू या क्राऊडफंडिंग पोर्टलवरून १.८९ लाख जमवले.

जेव्हा अर्णव दोन आठवड्यापूर्वी इएनटी तज्ज्ञाजवळ गेला होता तेव्हा पासून या मोहिमेला खरी सुरुवात झाली. यावेळी नायर रुग्णालयातील डॉक्टर आणि त्याच्यामध्ये कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा झाली. त्यानंतर अर्णवने आपल्या मित्राला या रुग्णांना मदत करण्यासाठी प्रोत्साहित केले.

याबाबत अर्णव म्हणाला की, ‘या आजारावरील उपचार खूप महाग आहे, काही लोकं हा खर्च करू शकत नाही आहेत. या रुग्णांचे जीव वाचवणारे अँटिफंगल इंजेक्शन, लिपोसोमल अॅम्फोटेरेसिनी बी (Amphotericin B) ५ हजार ते ८ हजारपर्यंत मिळते. त्यामुळे मी पैसे गोळा करून आपल्या जवळच्या रुग्णांना मदत करण्याचा निर्णय घेतला.’

या दोघांनी पैसे जमवण्याची मोहीम सुरू केली आणि इम्पॅक्टगुरूला संपर्क केला. क्राउडफंडिंग पोर्टलसोबत आपल्या सोशल मीडियावर अकाउंटद्वारे याबाबत जागरुकता फैलवण्याचा प्रयत्न ते करत आहे. अर्णवचा मित्र राणाई म्हणाला की, ‘व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आम्ही पैसे जमवण्यासाठी आमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना याची माहिती देत आहोत. सात दिवसांपूर्वी सुरू झालेल्या मोहीमेत ३० लोकांनी आपले योगदान दिले आहे. आम्ही जमवलेले पैसे नायर रुग्णालयात दिले जाईल. या पैशाद्वारे म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार केले जातील.’


हेही वाचा – काळ्या, पांढऱ्या आणि पिवळ्या बुरशीत नेमका फरक काय? कोणती बुरशी किती घातक? वाचा


 

First Published on: May 24, 2021 10:07 PM
Exit mobile version