घरताज्या घडामोडीकाळ्या, पांढऱ्या आणि पिवळ्या बुरशीत नेमका फरक काय? कोणती बुरशी किती घातक?...

काळ्या, पांढऱ्या आणि पिवळ्या बुरशीत नेमका फरक काय? कोणती बुरशी किती घातक? वाचा

Subscribe

देशात कोरोना व्हायरसचे संकट हळूहळू नियंत्रणात येत असताना अनेक आजारांचे संकट फोफावताना दिसत आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये पहिल्यांदा काळी बुरशी म्हणजेच म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाल्याच्या तक्रारीत वाढ झाली. त्यानंतर आता हा बुरशीजन्य आजार रंग बदलत असून तितकाच त्याचा धोका देखील वाढत आहे. काही दिवसांपूर्वी पांढऱ्या बुरशीचा संसर्ग झाल्याचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर आता काळ्या आणि पांढऱ्या बुरशीनंतर अधिक धोकादायक असलेली पिवळी बुरशी आढळली आहे. उत्तर प्रदेशमध्ये पिवळ्या बुरशीचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आज काळी, पांढरी आणि पिवळी बुरशीबद्दल जाणून घेणार आहोत. त्याची नेमकी लक्षणे काय आहेत? आणि उपचार काय आहेत? हे पाहणार आहोत.

काळी बुरशी (म्युकरमायकोसिस)

कोरोना रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्या डोळ्याला किंवा नाकाला एक इन्फेक्शन होत आहे. दुर्दैव म्हणजे काही जणांना यामुळे डोळे गमावावे लागले आहेत आणि काही जण मृत्युमुखी पडले आहेत. या आजारालाच म्युकरमायकोसिस म्हणजे काळी बुरशी म्हटले जाते. काळी बुरशी नाकाभोवती किंवा डोळ्यभोवतीच्या मोकळ्या जागेत साठून राहते. या आजारामुळे रोगाशी लढण्याची नैसर्गिक शक्ती कमी होते. हा आजार फार दुर्मिळ आहे. अनियंत्रित मधुमेह, शरीरातील सारखेचे अनियंत्रित प्रमाण किंवा स्टिरॉईडचा अतिरिक्त वापर किंवा बरेच दिवस आयसीयूमध्ये असलेल्या रुग्णांना काळी बुरशीचा संसर्ग होण्याची अधिक शक्यता आहे.

- Advertisement -

काळ्या बुरशीची लक्षणे

  • डोळ्यांभोवती वेदना होणे किंवा डोळे लाल होणे
  • ताप येणे
  • डोकेदुखी
  • खोकला
  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • रक्ताच्या उलट्या होणे
  • मानसिक स्थिती बदलणे

काळ्या बुरशीपासून सुरक्षित राहण्यासाठी काय कराल?

- Advertisement -
  • कोरोनातून बरे झाल्यानंतर सतत रक्तातीतल ग्लोकोजचे प्रमाणे पाहत रहा. त्याचबरोबर डायबेटिज असलेल्या रुग्णांनीही रक्तातील ग्लोकोजचे प्रमाण तपासत राहणे महत्त्वाचे आहे.
  • स्टिरॉईडचा योग्य वापर करा. दररोज पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा वापर करा.
  • नाक,डोळ्यांसंबंधी कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नका.
  • नाकाच्या बाबततीत कोणतेही लक्षण दिलसे तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. कारण म्युकरमायकोसिसची सुरुवात नाकापासून होते.
  • म्युकरमायकोसिस झाल्यास त्वरित सुरू करा त्यात जास्त वेळ घालवू नका, असे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितले आहे.

पांढरी बुरशी

काळी बुरशीचे रुग्ण आढळल्यानंतर आता पांढरी बुरशी झालेले रुग्ण आढळले आहेत. काळी बुरशीपेक्षा पांढरी बुरशी ही अधिक धोकादायक आहे. काही दिवसांपूर्वी पटनामध्ये पांढऱ्या बुरशीचे ४ रुग्ण आढळले होते.

पांढऱ्या बुरशीची लक्षणे

कोरोना आणि पांढऱ्या बुरशीत मोठ्या साम्य आहे ते म्हणजे, या रुग्णांच्या फुफ्फुसावर परिणाम होता. सर्वात पहिल्यांदा फुफ्फुसांना संसर्ग होतो, त्यानंतर इतर अवयवांवर त्याचा परिणाम होता. पांढऱ्या बुरशीचा सर्वात जास्त परिणाम नखं, त्वचा, पोट, किडनी, मेंदू, प्रायव्हेट्स पार्ट आणि तोंडाच्या आतमध्ये होतो.

पांढऱ्या बुरशीचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर काय केले उपचार?

या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर म्हणाले की, ‘त्यांची कोरोना चाचणी सतत निगेटिव्ह आली. त्यानंतर त्यांना White Fungus झाल्याचे समोर आले. तातडीने त्यांच्यावर अँडी फंगल औषधांचे उपचार सुरू केले, ज्यामुळे रुग्ण बरे झाले आहेत.’

पिवळी बुरशी

देशात आता काळ्या, पांढऱ्या बुरशीपेक्षा अधिक धोकादायक आणि घातक पिवळी बुरशी आढळली आहे. उत्तर प्रदेशमधील गाझीयाबादमध्ये पिवळ्या बुरशीचा पहिला रुग्ण आढळला आहे.

पिवळ्या बुरशीची लक्षणे

  • सुस्तपणा येणे
  • भूक कमी लागणे
  • वजन कमी होणे
  • स्पष्ट न दिसणे
  • पू ची गळणे
  • जखम लवकर बरी न होणे
  • कुपोषण
  • अवयव निकामी होणे
  • डोळे येणे

पिवळी बुरशी होण्यामागचे कारणे

जर घरामध्ये जास्त आर्द्रता म्हणजेच दमटपणा असेल तर रुग्णासाठी हे घातक असू शकते. त्यामुळे याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. जास्त आर्द्रता बॅक्टेरिया आणि बुरशीचे प्रमाण वाढवते. तसेच घरातील आणि आजूबाजूची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. अस्वच्छता असणे हे पिवळ्या बुरशीच्या संसर्गामागचे मुख्य कारण आहे. शिळे अन्न खाऊ नये.

पिवळ्या बुरशीच्या रुग्णावर उपचार

माहितीनुसार, या आजारावर अॅम्फोटेरेसिनी बी (Amphotericin B) इंजेक्शन उपचार करण्यासाठी वापरले जाते.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -