School Holidays 2023 : विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षात मिळणार ‘इतक्या’ सुट्ट्या

School Holidays 2023 : विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षात मिळणार ‘इतक्या’ सुट्ट्या

नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. एकीकडे ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्ट्यांचा उत्साह मुलांमध्ये दिसत असतानाच दुसरीकडे 2023 मध्ये येणाऱ्या सुट्ट्यांमुळे पालक चिंतेत आहेत. खरं तर मुलांच्या सुट्ट्या आधीच माहीत असतानाच पालकांना सुट्टीसाठी योजना करणे किंवा कुठेतरी जाण्याची योजना करणे सोपे होणार आहे. कारण येत्या वर्षात (2023) एकूण 121 सुट्टया मिळणार आहेत. (Schools will remain closed for 4 months in the year 2023)

पुढील वर्षात विद्यार्थ्यांना मिळमाऱ्या सर्व सुट्ट्या एकत्र केल्या तर संपूर्ण 4 महिने शाळा बंद राहतील इतक्या सुट्ट्या आहेत. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या 121 सुट्ट्यांमध्ये 53 रविवारचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, इतर सार्वजनिक सुट्ट्या आणि सणांच्या पार्श्वभूमीवर मिळणाऱ्या सुट्ट्यांची समावेश करण्यात आला आहे. परंतु, उन्हाळी सुट्टी आणि हिवाळी सुट्टीचा समावेश करण्यात आलेला नाही.

नवीन वर्षात रामनवमी, बकरीईद, रक्षाबंधन, जन्माष्टमी अशा सुट्या गुरवारी येत आहेत तर गुडफ्राय डे, आंबेडकर जयंती, बुध्द पौर्णिमा शुक्रवारी आहेत. तसंच शनिवारी महाशिवरात्री आणि मकर संक्रात आहे.

नवीन वर्षातील सुट्ट्या


हेही वाचा – महापुरुषांवरील वादग्रस्त वक्तव्याविरोधात उद्या वरळी बंदची हाक

First Published on: December 14, 2022 11:01 AM
Exit mobile version