घरताज्या घडामोडीमहापुरुषांवरील वादग्रस्त वक्तव्याविरोधात उद्या वरळी बंदची हाक

महापुरुषांवरील वादग्रस्त वक्तव्याविरोधात उद्या वरळी बंदची हाक

Subscribe

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच, महापुरूषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी वरळी बंदची हाक देण्यात आली आहे. त्यानुसार, १५ डिसेंबर रोजी वरळी बंदची हाक देण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच, महापुरूषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी वरळी बंदची हाक देण्यात आली आहे. त्यानुसार, १५ डिसेंबर रोजी वरळी बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर वरळीकरांकडून बंदचे पोस्टर्स सध्या व्हायरल केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. (Worli bandh called tomorrow against controversial statements on great men of maharashtra)

मिळालेल्या माहितीनुसार, महापुरूषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी वरळी बंदची हाक देण्यात आली आहे. त्यानुसार, १५ डिसेंबर रोजी सकाळी ७:०० वाजल्यापासून ते संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत बंद पाळला जाणार आहे. त्यामुळे पुण्यानंतर आता मुंबईच्या वरळी परिसरात बंदची हाक देण्यात आली आहे.

- Advertisement -

या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून काय आदेश काढले जातात याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच, वरळी परिसर हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात येतो. त्यामुळे या वरळी बंदच्या पार्श्वभूमीवर आंदोलन केल्यास आदित्य ठाकरे या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच, महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज्याच्या अनेक भागांत आंदोलने केली जात आहेत. मंगळवारी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. राज्यपालांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर पुण्यात त्यांच्याविरोधात बंदची हाक देण्यात आली. त्यानुसार पुण्यातील मार्केटसह सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

- Advertisement -

या बंदच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुमारे साडेसात हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यत आला होता.

या मोर्च्यात छत्रपती उदयनराजे महाराज, छत्रपती संभाजी राजे, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आदी नेते सहभागी झाले होते. तसेच या बंदनिमित्त होणाऱ्या जाहीर सभेत जनतेला संबोधितही करणार आहेत. यात स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


हेही वाचा – राज्यपालांविरोधात पुण्यात आज कडकडीत बंद; ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -