Sharad Pawar health update: शरद पवारांवर होणार दुसरी शस्त्रक्रिया – राजेश टोपे

Sharad Pawar health update: शरद पवारांवर होणार दुसरी शस्त्रक्रिया – राजेश टोपे

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर मंगळवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. पोटदुखीच्या त्रासामुळे त्यांना मंगळवारी रात्री रुग्णालयात दाखल केले आणि त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती चांगली आहे आणि पोटदुखील सुद्धा कमी झाली आहे. लवकरात लवकर त्यांचे पित्ताशय काढून टाकण्याची दुसरी शस्त्रक्रिया होणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राजेश टोपे म्हणाले की, काल (मंगळवार) झालेल्या शस्त्रक्रियेनंतर पवारांना आरोम मिळाला आहे. पित्तनलिकेत खडा अडकल्याने पवारांना पोटदुखीचा त्रास निर्माण झाला आहे. अँटीस्कोपीच्या माध्यमातून खड्डा काढण्यात आला असून आता वेदना कमी झाल्या आहेत. चार ते पाच दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. परंतु डॉक्टरांनी पित्ताशय काढण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पित्ताशय काढण्याची देखील लवकरात लवकर शस्त्रक्रिया केली जाईल. त्यासाठी त्यांना पुन्हा अॅडमिट व्हावे लागेल. पवारांची प्रकृती आता उत्तम आहे.

काही तासांपूर्वी भाजप नेते नारायण राणे सपत्निक शरद पवारांच्या भेटीला ब्रँची कँडी रुग्णालयात दाखल झाले होते.  यावेळेस भाजप आमदार नितेश राणे देखील पवारांची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. याशिवाय राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ सुद्धा पवारांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी शरद पवारांची प्रकृती उत्तम असल्याची प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी पवारांची भेट घेतल्यानंतर दिली. हसन मुश्रीफ यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतली. ५ ते १० मिनिटे शरद पवारांशी चर्चा केली असल्याचे सांगितले आहे.


हेही वाचा – पवार साहेब सर्वात आवडतं काम करताना, सुप्रिया सुळेंकडून हॉस्पिटलमधील फोटो ट्विट


 

 

First Published on: March 31, 2021 1:06 PM
Exit mobile version