ज्येष्ठ पत्रकार सदानंद शिंदे यांचं कोरोनामुळे निधन

ज्येष्ठ पत्रकार सदानंद शिंदे यांचं कोरोनामुळे निधन

ज्येष्ठ पत्रकार सदानंद शिंदे यांचं कोरोनामुळे निधन

ज्येष्ठ पत्रकार सदानंद शिंदे यांचं रविवारी रात्री साडे आठ वाजता कोरोनामुळे निधन झालं. त्यांनी ६४व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

गेली ३५ वर्षे पत्रकारितेत असणाऱ्या शिंदे यांनी श्री सप्ताहिकामधून आपल्या लेखनाला सुरुवात केली होती. सखोल रिपोर्ताज हे त्यांच्या पत्रकारितेचे वैशिष्ट्य होते. राजकीय पत्रकारिता करताना सदाभाऊ यांनी आपल्या आक्रमक लिखाणाने स्वतःचा एक दबदबा निर्माण केला होता

‘रत्नागिरी टाइम्स’, ‘नवकाळ’ आणि ‘पुण्यनगरी’ आदी वर्तमानपत्रामधून त्यांनी राजकीय पत्रकारिता केली. त्यांच्या विशेष लेखमाला गाजल्या होत्या आणि सरकारला आपले काही निर्णय बदलावे लागले होते. अनेक राजकीय नेत्यांशी त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते, पण त्याचा आपल्या बातमीदारीवर त्यांनी कधी परिणाम होऊ दिला नाही.

मंत्रालयात नवीन पत्रकारांना तर ते नेहमी मोठा आधार वाटत असतं. पत्रकारांच्या मदतीसाठी ते नेहमी पुढाकार घेत असतं. त्यांच्या निधनाने पत्रकार क्षेत्राची हानी झाली आहे. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)


हेही वाचा – पंडित राजन मिश्र यांचे कोरोनामुळे निधन, पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली


First Published on: April 25, 2021 10:31 PM
Exit mobile version