30 वर्षांच्या तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ

प्रातिनिधिक फोटो

माहीम येथे एका 30 वर्षांच्या तरुणाचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी माहीम पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करुन तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शीव रुग्णालयात पाठविला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर त्याची हत्या झाली आहे का याचा उलघडा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. माहीम येथील रेतीबंदर, दर्गा स्ट्रिट, बापू हाऊसमागे एक तरुण पडल्याची माहिती सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता माहीम पोलिसांना मिळाली होती.

या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पोलिसांना तिथे एक तरुण बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसून आले. पंचनामा त्याला पोलिसांनी शीव रुग्णालयात दाखल केले, मात्र तिथे त्याला डॉक्टरांनी तो मृत असल्याचे घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

या तरुणाची ओळख पटली नाही, ओळख पटेल अशी कोणतीही वस्तू सापडली नाही. त्याची हत्या झाली की त्याचा मृत्यू नैसगिक आहे याचा शवविच्छेदन अहवालानंतर खुलासा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

First Published on: January 14, 2020 1:40 AM
Exit mobile version