शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचा मोर्चा

शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचा मोर्चा

शिवसेनेचा मोर्चा

कल्याण तालुक्यात ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी आज, सोमवारी शिवसेनेच्यावतीने कल्याण तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांकडे केली.

अवकाळी पावसामुळे कल्याण तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र शासनाकडून त्यांना अद्यापही मदत न मिळाल्याचे सांगत शिवसेनेतर्फे या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार आणि बागायतदारांना हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी शिवसनेतर्फे करण्यात आली. दरम्यान, शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तहसिलदार दिपक आडके यांची भेट घेत त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी मोर्चात सेनेचे पदाधिकारी अरविंद मोरे, रवी पाटील, अल्ताफ भाई शेख, सदानंद थरवळ, रवी कपोते, रमेश जाधव, संजय पाटील, तात्यासाहेब माने, उमेश नाईक, सुनील वायले, शरद पाटील, वंडार कारभारी, किशोर भाई शुक्ला महिला आघाडीच्या छायाताई वाघमारे, कविता गावंड, अस्मिता माने, किरण मोंडकर, राधिका गुप्ते याच बरोबर शेकडो शिवसेना नगरसेवक पदाधिकारी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

हेही वाचा – 

‘आम्ही १६२’, या आणि स्वतः बघा; संजय राऊत यांचे राज्यपालांना आमंत्रण

First Published on: November 25, 2019 5:34 PM
Exit mobile version