चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास डावलला?

चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास डावलला?

शिवाजी महाराज

केंद्रीय शिक्षण मंडळातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास डावलला जात असताना आता राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाकडून सुद्धा चौथीच्या पुस्तकातून महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राज्यातील शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना स्थानिक संस्कृती जपत आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची सुरुवात करण्यात आली. या वर्षी मंडळाने पहिली ते चौथीच्या पुस्तकांची ऑगस्टमध्ये छपाई केली आहे. यातून ही बाब समोर आली आहे.

गेली अनेक वर्षे चौथीच्या विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवण्यात येतो. सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री असताना चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात शिवाजी महाराजांचा इतिहास कधीही न बदलण्याबाबत विधिमंडळात ठराव झाला होता. त्यानंतर सरकार बदलली तरी पुस्तकातील अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कायम ठेवण्यात आला. पण आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ याला अपवाद ठरत असल्याचे दिसत आहे.

सध्याच्या चौथीच्या पुस्तकात काय?

आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकात भारतीय लोक या घटकांत शिवाय महाराज, रामदास स्वामी, एकलव्य, लाल बहादूर शास्त्री आणि हनुमान यांची संक्षिप्त माहिती देण्यात आली आहे. राज्यमंडळाच्या पुस्तकांत गोष्टीरुपात मांडण्यात आलेला शिवाजी महाराजांचा इतिहास आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकात डावलण्यात आला आहे.

First Published on: October 17, 2019 12:50 PM
Exit mobile version