‘चिंतामणी’च्या दरबारात साकारणार ७५ फुटी शिवलिंग

‘चिंतामणी’च्या दरबारात साकारणार ७५ फुटी शिवलिंग

यंदा चिंचपोकळीचा चिंतामणी शतकमहोत्सवी वर्ष साजरी करणार असून यंदाच्या उत्सावात विविध कार्यक्रम, उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदा चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दरबारात नेपाळ येथील पशुपतीनाथ मंदिराचा देखावा सादर करण्यात येणार आहे. हा यंदाचा देखावा भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. हे संपुर्ण दृश्य कला दिग्दर्शक नितीशकुमार यांच्या संकल्पनेतून सादर करण्यात येत आहे.


हेही वाचा – कागदी लगद्याने साकारली ‘तेजूकायाची २२ फुटांची मूर्ती

असा असणार ‘चिंतामणी‘च्या दरबारातील देखावा

चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दरबारात नेपाळ येथील पशुपतीनाथ मंदिराचा देखावा सादर करण्यात येणार आहे. यावेळी मुख्य प्रवेशद्वारावर ७५ फूट उंची असणारे शिवलिंग तयार करण्यात येणार आहे. त्या शिवलिंगावर मंगल कलशातून जलाभिषेक होणार आहे. मुख्य प्रवेशद्वारा प्रवेश करताना भाविकांना नक्कीच आनंद होईल हे निश्चित.

विजय खातू यांच्या संकल्पनेतून साकारणारी चिंतामणीची मुर्ती यंदा त्यांची कन्या रेश्मा खातू यांनी साकारली आहे.

First Published on: August 29, 2019 1:48 PM
Exit mobile version