शिवसेना दसरा मेळावा – ‘आम्ही भडव्यांचे राज्य घालवल्याशिवाय राहणार नाही’!

शिवसेना दसरा मेळावा – ‘आम्ही भडव्यांचे राज्य घालवल्याशिवाय राहणार नाही’!

संजय राऊत

दरवर्षी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचंच लक्ष असतं. यंदा शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळाव्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आधीच खासदार संजय राऊत त्यांनी सत्ताधारी भाजपवर सडकून टीका केली. ‘माणूस तोंडाने कडवा असावा, पण गोडबोल्या भडवा नसावा’, अशा शब्दांत संजय राऊत यांनी थेट भाजपवर टीका केली. तसेच, ‘आम्ही भडव्यांचे राज्य घालवल्याशिवाय राहणार नाही’ अशी घोषणाही राऊत यांनी यावेळी केली. त्यामुळे आता शिवसेना विरूद्ध भाजप असा थेट सामना महाराष्ट्रात रंगण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

गेल्या ४ वर्षांत पुलाखालून खूप पाणी गेले आहे. पण येत्या ६ महिन्यांत मंत्रालायतला कचरा साफ होईल, असे सांगत ‘२०१९ ला या शिवतीर्थावर शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल’, असा आशावाद राऊत यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या या मेळाव्याला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे महत्त्व आहे.


शिवसेना दसरा मेळावा : उद्धव ठाकरेंनी केली अयोध्येसंदर्भात महत्त्वाची घोषणा!

उद्धव ठाकरेंची शिवसेना दसरा मेळाव्यात घोषणा

काय म्हणालेत राऊत?

‘ही सभा क्रांतिकारक आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या मेळाव्याकडे लागले आहे. शिवसेना प्रमुख या मेळाव्यातून कोणती दिशा देतात? आणि शिवसैनिकांना कोणते आदेश देतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांनी ४ वर्षे जाऊ दिली. पण आता आपली वेळ आलीये’, असे सांगत भाजपाला त्यांनी इशाराच दिला.

आता यांची हातभर फाटली!

काही झालं तरी शिवसेना आपल्यासोबतच हवी असा यांना आता साक्षात्कार झाला. पण आपल्या भाषेत सांगायचे, तर आता यांची हातभर फाटली आहे’, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच ‘या मैदानात ज्या आज लाटा आहेत त्या स्वबळाच्या लाटा आहेत’, असे सांगून संजय राऊत यांनी स्वबळाचा नारा दिला. याशिवाय ‘काँग्रेसच्या राज्यात एक चहावाला पंतप्रधान झाला आणि यांच्या राज्यात इंजिनिअरला पकोडे विका असे सांगतात’, असा आरोप संजय राऊत यांनी भाजपावर केला. २०१९ ला जनता मूर्ख बनणार नाही. आणि मूर्ख बनवणाऱ्यांना जनता फेकून दिल्याशिवाय राहणार नाही, असे देखील संजय राऊत यांनी आपल्या भाषणात सांगितले.


तुम्ही हे वाचलंत का? – दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने ‘अशी’ जमवली गर्दी

First Published on: October 18, 2018 7:38 PM
Exit mobile version