घरमुंबईशिवसेना दसरा मेळावा : २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा!

शिवसेना दसरा मेळावा : २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा!

Subscribe

२०१९साली होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दसरा मेळाव्याला एक वेगळंच महत्त्व आहे. त्यामुळेच या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे नक्की कोणती घोषणा करणार? कोणता निर्णय जाहीर करणार? स्वबळाचा नारा देणार का? याविषयी उत्सुकता प्रचंड शिगेला पोहोचली होती. त्यानुसार उद्धव ठाकरेंनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला.

दरवर्षी मुंबईकरांना दसऱ्याच्या दिवशी कुठल्या गोष्टीची उत्सुकता असेल, तर ती म्हणजे शिवाजी पार्कवर होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची! त्यातच पुढच्या वर्षी म्हणजेच २०१९साली होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दसरा मेळाव्याला एक वेगळंच महत्त्व आहे. त्यामुळेच या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे नक्की कोणती घोषणा करणार? कोणता निर्णय जाहीर करणार? स्वबळाचा नारा देणार का? याविषयी उत्सुकता प्रचंड शिगेला पोहोचली होती. त्यानुसार उद्धव ठाकरेंनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला.

मी २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार

खोटं बोलून बोलून आपण देश ज्वालामुखीच्या तोंडावर नेऊन ठेवलाय. एकदा का ज्वालामुखी फुटला तर तुम्ही सत्तेच्या जवळपासही जाऊ शकणार नाही. संघाच्या मेळाव्यातही सरसंघचालकांनी शिवसेनेचीच भूमिका मांडली. राम मंदीर कधी बांधणार? हे माहीत नाही. अनेक शिवसैनिक मारले गेले. जर राममंदीर बांधायचं असेल, तर त्यांच्या मृत्यूचं काहीतरी चीज ठेवा. १५ लाखांचा जसा जुमला होता तसंच राम मंदीर बांधा नाहीतर तो जुमला होता असं जाहीर करा. यासाठीच मी २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आहे. जे प्रश्न मी इथे विचारतोय, तेच प्रश्न मी अयोध्येला जाऊन विचारणार. मोदींना मी सांगणार आहे तुम्ही जनतेच्या भावनांशी खेळू नका. जनतेच्या आशेवर पाणी पडलं, तर त्याचा लाव्हारस होईल आणि त्यात तुमचं सिंहासन जळून खाक होईल. सगळ्या देशांमध्ये पंतप्रधान गेले, पण गेल्या साडेचार वर्षांत मोदी अयोध्येत का गेले नाहीत?

- Advertisement -

एनडीएच्या सरकारच्या डीएनएमध्ये काहीतरी प्रॉब्लेम

तुम्ही मंदिर बांधलं नाहीत, तर आम्ही अयोध्येत राम मंदिर बांधू. आम्ही राम मंदिराचं आश्वासन विसरलेलो नाहीत. राम मंदिर जर सरकारचा जुमला असेल, तर या एनडीएच्या सरकारच्या डीएनएमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असंच म्हणावं लागेल.

पाकिस्तान आमचा मित्र आहे की शत्रू आहे?

सिद्धू पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या शपथविधीला गेला. त्यानं शेण खाल्लं. आमच्या पंतप्रधानांच्या शपथविधीला पाकिस्तानचे पंतप्रधान येतात. मग पाकिस्तान आमचा मित्र आहे की शत्रू आहे? क्रिकेट खेळणार नाही या घोषणेला किती दिवस झाले? तरी क्रिकेट सुरूच आहे. कशासाठी तुम्हाला घ्यायचं डोक्यावर? ५ राज्यांच्या निवडणुका समोर येतात. देशातले महागाई, दुष्काळासारखे प्रश्न बाजूला ठेऊन सरकारचे सगळे मंत्री, पंतप्रधान या ५ राज्यांमध्ये भाषणं करणार.

- Advertisement -

शेतकऱ्यांचे निर्णय एका रात्रीत का नाही?

दुष्काळ जाहीर करायचा असेल तर समिती नेमून चर्चांमध्ये दिवस काढले जातात. पण कर वाढवायचे असतील, नोटबंदी करायची असेल, पेट्रोलचे दर वाढवायचे असतील तर धाडकन एकाच रात्रीत निर्णय घेता. असं का? या निर्णयांसाठी चर्चा होत नाहीत का?

महिलांनी मीटू-मीटु करू नका

महाराष्ट्रातल्या रणरागिणींना वाटेत जर कुणी तुम्हाला त्रास दिला तर मीटु मीटु करत नाही बसायचं, खाडकन तिथेच कानाखाली द्यायची. तुमच्या पाठिशी शिवसैनिक उभा आहे.

विष्णुचा ११वा अवतार तुमच्यासोबत असून महागाई रोखता येत नाही!

पेट्रोलचे भाव म्हणजे थट्टाच झालीये. आता मटका लागतो तसे आजचा भाव लावावा लागेल. रवीशंकर प्रसाद म्हणतायत तेलाच्या किंमती, महागाई रोखणं आमच्या हातात नाही. मग तुमच्या हातात नक्की आहे तरी काय? ना महिलांवरचे अत्याचार रोखू शकत, महागाई रोखू शकत, मग तुमच्या हातात आहे तरी काय? विष्णूचा ११वा अवतार तुमच्यासोबत असूनही तुम्हाला महागाई रोखता येत नाही, मग तुम्ही बसता कशाला सत्तेवर?

२०१९ला काय होणार?

काय होणार? या चर्चेपेक्षा काय करणार? हा विचार केला पाहिजे. २०१९मध्ये प्रत्येकानं ठरवायचं की जर काही होणार असेल तर ते मी करणार आणि दिल्लीला भगवा फडकणार म्हणजे फडकणारच!

लढायला आमचाच धनुष्यबाण लागणार!

यावेळी दसऱ्याचा रावण वेगळा आहे. पेट्रोल आहे, महागाई आहे. सरकार कुणाचंही असलं, पंतप्रधान कुणीही असला तरी दरवर्षी समस्यांचा हा रावण उभाच आहे. पण राममंदिर काही उभं राहात नाही. पंतप्रधान दिल्लीत आहेत, त्यांना युद्ध लढायला आमचाच धनुष्यबाण आहे. पण ते पेलायलाही मर्द लागतो.

मला राजकारण शिकवायच्या फंदात कुणी पडू नये

मला राजकारण शिकवायच्या फंदात कुणी पडू नये. आम्हाला जे पटलं नाही त्याविरोधात बोलायचं मला वडिलांनी शिकवलं आहे. त्याविरोधात मी बोलणारच. सध्या सरकारविरोधात बोललं की देशद्रोह होतो. पण जसं शिवसेना बोलत होती, तसंच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघही बोलायला लागलाय. काही दिवसांपूर्वी भैय्याजी जोशीही बोलले आहेत.

देवेंद्र तुम्ही जबाबदारीने वागा

हाऊसिंग सोसायटीची निवडणूक जिंकायची असली, तरी मुख्यमंत्र्यांचे फोन जातात. देवेंद्र तुम्ही जबाबदारीने वागा. असा कारभार बघून बोलायचं नाही तर काय आरत्या ओवाळत बसायच्या?

अटलजींचीही सांगितली एक आठवण!

अटलजी, अडवाणी, प्रमोदजी, गोपीनाथजी यांच्याशी असलेला ऋणानुबंध फक्त सत्तेसाठी नव्हता, तो कुटुंबाचा होता. ९० सालात मी फार काही प्रचारसभा घेत नव्हतो. नागपूर, विदर्भात मी प्रचार करत होतो. परत मुंबईला येत असताना विमानात माझ्या पुढे अटलजी बसले होते. मी हवाई सुंदरीकडून अटलजींना नमस्कार कळवला. चहापान झाल्यावर अटलजी माझ्यासमोर येऊन उभे राहिले. म्हणाले ‘कैसी चल रही है युती?’ मी म्हणालो जमीन पे ही नहीं, आसमान में चल रही है’. एवढ्या मोठ्या माणसाने माझ्याकडे स्वत: येऊन चौकशी करणं याला म्हणतात मोठेपण.

रमजानला युद्धबंदी आणि आमच्या सणांमध्ये नको त्या बंदी आणता. हिंदुंच्या सणांमध्ये ज्या फालतूच्या बंद्या आणताय, त्या आधी बंद करा. आम्हाला बोलताना जर तुम्ही आवाज देखील बंद करणार असाल, तर माईक बाजूला सारून हिंदुत्वाचा नारा देईन.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -