शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात महिलेची बलात्काराची तक्रार

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात महिलेची बलात्काराची तक्रार

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात एका महिलेने बलात्काराची तक्रार केली आहे. मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाणे येथे या महिलेने लेखी तक्रार नोंदवली आहे. दरम्यान शेवाळे यांनी हे आरोप फेटाळले आहेत. आपली प्रतिमा मलिन करण्यासाठीच अशा प्रकारची तक्रार दाखल करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महिलेने राहुल शेवाळे यांच्या विरोधात लेखी तक्रार केली आहे. पण या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. पोलीस या प्रकरणात आणखी चौकशी करत आहेत, असे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

राहुल शेवाळेंचे स्पष्टीकरण

मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यात एका महिलेकरवी माझ्या विरोधात करण्यात आलेली लेखी तक्रार ही संपूर्णतः निराधार असून सामाजिक – राजकीय क्षेत्रातील माझी प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने हेतुपुरस्सर करण्यात आली आहे. माझा मुंबई पोलीस आणि कायद्यावर पुर्णतः विश्वास असून याबाबत पोलीस आणि न्याययंत्रणा योग्य निर्णय घेईल, असा मला विश्वास आहे. या निवेदनाद्वारे मी स्पष्ट करू इच्छितो की माझे निर्दोषत्व सिध्द करण्यासाठी मी कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी तयार असून या बोगस तक्रारीमागे असणाऱ्या लोकांचाही पर्दाफाश लवकरच करेन.

याआधी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधातही एका महिलेने बलात्काराच्या प्रकरणाची धमकी देत पाच कोटी रूपयांची मागणी केली होती. जर मागणी पूर्ण झाली नाही तर बलात्काराचे प्रकरण पुन्हा बाहेर काढेन असेही महिलेने म्हटले होते. मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे.


 

First Published on: April 28, 2022 10:16 PM
Exit mobile version