फडणवीसांनी संयमाचा बाम चोळून शांत राहावं – शिवसेना

फडणवीसांनी संयमाचा बाम चोळून शांत राहावं – शिवसेना

Devendra fadnavis criticized cm uddhav thackeray says he is trying to change constitution

दिल्लीच्या जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर मुंबईत तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने जमा होऊन निदर्शनं केली होती. त्यातच एका तरुणीने ‘Free Kashmir’ असं लिहिलेला बॅनर हातात घेतला होता. यावरून देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर ट्वीटरवरून टीका केली होती. मात्र, नंतर ही तरुणी मराठीच असल्याचं आणि तिने हातात तो बॅनर वेगळ्या हेतूने घेतल्याचं स्पष्ट झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि भाजपची पंचाईत झाली. त्यावरून आता शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. ‘विरोधी पक्षाने स्वत:ची प्रतिष्ठा गमावणे, स्वत:ची विश्वासार्हता घालवून बसणे महाराष्ट्राला परवडणारे नाही. आम्हाला विरोधी पक्षाची काळजी वाटते!’ अशी खोचक टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. ‘मेहक प्रभू या मुलीने झळकावलेल्या फ्री काश्मीर फलकाबाबत विरोधी पक्षनेत्यांनी सारासार विचार न करता सरकारवर टीका केली आणि नंतर मेहक प्रभूने नेमकं काय केलं, हे स्पष्ट झाल्यावर तोंडावर आपटले’, असं देखील या अग्रलेखात म्हटलं आहे.

काय होतं हे पोस्टर….

‘विरोधी पक्ष दिशाहीन, भरकटलेला’

दरम्यान, या अग्रलेखामध्ये भाजपवर बोचऱ्या शब्दांमध्ये टीका करण्यात आली आहे. ‘विरोधी पक्षाचं इतकं अध:पतन गेल्या ५० वर्षांमध्ये कधीच झालं नव्हतं, पण माजी मुख्यमंत्री फडणवीस जेव्हापासून विरोधी पक्षनेतेपदावर विराजमान झाले आहेत, तेव्हापासून विरोधी पक्ष दिशाहीन आणि भरकटलाय. फ्री काश्मीरच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांनी केलेला आरोप म्हणजे भंपकपणाचा कळसच ठरला’, असं या अग्रलेखात म्हटलं आहे.

काय म्हटले होते फडणवीस…

‘विरोधी पक्षाला समुपदेशनाची गरज’

अग्रलेखातून शिवसेनेने भाजपला सल्ला देखील दिला आहे. ‘विरोधी पक्षनेतेपदाची किंमत त्यांनीच ठेवायला हवी. ती उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांची जबाबदारी नाही. फडणवीसांनी त्यांच्या वेदनेवर संयमाचा बाण चोळून काही काळ शांत राहायला हवे. असे भन्नाट आरोप करून ठाकरे सरकार पडणार नाही. यापेक्षा त्यांनी विरोधी पक्षाची जबाबदारी आणि कर्तव्य अशा विषयांवर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये मार्गदर्शक शिबीर आयोजिक करून त्यात सहभागी व्हायला हवे. ज्याला कौन्सिलिंग म्हणतात, अशा समुपदेशनाची विरोधी पक्षाला गरज आहे’, असा टोला यात लगावण्यात आला आहे.

पाहा मेहेकने नंतर काय केला खुलासा…

First Published on: January 9, 2020 8:42 AM
Exit mobile version