Viral Video: पाणीपुरीच्या पाकीटात उंदारचं पिल्लू! व्हिडिओ व्हायरल

Viral Video: पाणीपुरीच्या पाकीटात उंदारचं पिल्लू! व्हिडिओ व्हायरल

चवीने पाणीपुरी खाणाऱ्यांसाठी आरोग्याचा प्रश्न उपस्थित करणारी बातमी समोर आली आहे. रस्त्यावर विकणाऱ्या पाणीपुरीबाबत आतापर्यंत बऱ्याच बातम्या समोर आल्या आहेत. तरीही, लोकं पाणीपुरी खाणं सोडत नाही. पण, आता पाणीपुरीबाबत व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे तुम्ही यापुढे पाणीपुरी खाल की नाही हा प्रश्न उपस्थित होईल. सध्या पाणीपुरीच्या पाकिटात उंदराचं पिल्लू सापडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. औरंगाबाद येथील सिल्लोड शहरातील एका पाणीपुरी विक्रेत्याच्या पाणीपुरीच्या पाकिटात उंदीर हे पिल्लू आढळलं असल्याचं बोललं जात आहे. शिवाय, त्याचा व्हिडिओ ही व्हायरल झाला असून पुन्हा एकदा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

रस्त्यावरचे पदार्थ खाऊ नका असं बऱ्याचदा सांगितलं जातं. तरीही, चवीचे खाण्याचा मोह कोण आवरणार? यामुळेच आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. मुंबईतही आतापर्यंत असे बरेच प्रकार घडले आहेत. मुंबईतील एका स्थानकावर विकला जाणाऱ्या लिंबू सरबताचा व्हिडिओ ही व्हायरल झाला होता. त्यानंतर काही काळ अशा व्हिडिओंवर भाष्य झालं. पण, पुन्हा लोकांनी लिंबू पाणी प्यायला सुरूवात केली. आता पाणीपुरीचा हा व्हिडीओ बघून तुम्हाला रस्त्यावर विकली जाणारी पाणीपुरी खावीशी वाटेल का? हे तुम्हीच ठरवा.

रस्त्यांवर विकल्या जाणाऱ्या पदार्थांविषयी अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं आहे. त्या त्या संबंधित विभागाअंतर्गत कारवाई देखील केली जाते. खरंतर पाणीपुरीच्या पुऱ्या कुठे आणि कशा तयार केल्या जातात याविषयीचे ही बरेच व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. पण, अशा व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे लोकांच्या आरोग्याचा मुद्दा मात्र दूर सारला जातो.

हेही वाचा –

अॅमेझॉनवर हेच बघायंच बाकी होतं; ही वस्तूदेखील आली विक्रीला

First Published on: October 11, 2019 4:14 PM
Exit mobile version