मंत्रालयात मोठ्या स्क्रिनवर दिसणार निकाल; भाजपानेही केली खास तयारी

मंत्रालयात मोठ्या स्क्रिनवर दिसणार निकाल; भाजपानेही केली खास तयारी

भाजप कार्यालय

२३ मे… सगळ्या राजकीय पक्षाना ज्या तारखेची उत्सुकता लागली आहे. ती तारीख अर्थात तो दिवस उजाडायला अवघे काही तासच उरले आहेत. या तारखेला खास महत्व आलंय ते म्हणजे लोकसभा निवडणुकीचे निकाला उद्या अर्थात २३ मे रोजी लागणार आहे. अनेक राजकीय पक्षाचे भविष्य ज्या मतपेटीत बंद झाले ती मतपेटी उद्या उघडणार आहे. एकीकडे एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा भाजपाचे सरकार येत असल्याचे जरी दिसत असले तरी उद्या मात्र सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. खरतंर सकाळी ८ वाजल्यापासून राज्यासह देशात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोग देखील कामाला लागला आहे. सर्व वृत्त वाहिन्या असोत वा वेबपोर्टल निकालाचे लाईव्ह अपडेट कसे सगळ्यात फास्ट देता येतील यासाठी कामाला लागले आहेत. मात्र आता निवडणूक आयोग देखील लोकांना निकाला पाहता यावे, यासाठी कामाला लागले आहे. आयोगाच्या वेबसाईटवर तर निकाल पाहता येणार आहेतच पण मोठ्या स्क्रिनवर देखील निकाला पाहता यावेत, यासाठी आयोगाने व्यवस्था केली आहे.

मंत्रालयात लागणार ३ मोठ्या स्क्रिन

मंत्रालयात राज्याच्या कानाकोपऱ्यातून बरेच जण येत असतात. त्यामुळे मंत्रालायतील कर्मचाऱ्यांना आणि मंत्रालयात येणाऱ्या जाणाऱ्यांना निकाला पाहता यावेत म्हणून मंत्रालय परिसरात तीन स्क्रिन लावले जाणार आहे. त्यातील एक स्क्रिन त्रिमूर्तीच्या इथे म्हणजे मंत्रालायत, दुसरी स्क्रिन गार्डन गेट तर तिसरी स्क्रिन मंत्रालयाच्या मेन गेटवर लावली जाणार आहे. दरम्यान या स्क्रिनवर दाखवण्यात येणारे निकाला जरी इतर वृत्त वाहिन्यांप्रमाणे जलद नसले तरी अचूक असणार आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

भाजपा कार्यालया बाहेरही मोठा स्क्रिन

दरम्यान भाजपाने देखील आपल्या प्रदेश कार्यालाबाहेर निकाला पाहता यावा यासाठी स्क्रिन लावला असून, येथे बसण्याची देखील व्यवस्था केली आहे. एवढच नाही तर सर्वेने जे अंदाज वर्तविले आहेत तसेच निकाला येतील हे गृहीत धरून भाजपाने १०० किलो लाडूची ऑर्डर देखील दिली आहे.

राज पुरोहितांनी बनवला सव्वाशे किलोचा एक लाडू

नेहमीच पक्षासाठी काही तरी हटके करणाऱ्या आमदार आणि प्रतोद राजपुरोहित यांनी यावेळी देखील एक 125 किलोचा भला मोठा लाडू बनवला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार दुपारनंतर भाजपा कार्यालायत आले की हा लाडू सर्वांना भरवण्यात येणार आहे.

हेही वाचा –

‘पक्षाच्या स्थापनेनंतर प्रथमच राष्ट्रवादी जिंकणार सर्वाधिक जागा’

‘राज्यातल्या ४८ जागा आम्हीच जिंकणार’

पुढचे २४ तास महत्त्वाचे! राहुल गांधींचं कार्यकर्त्यांसाठी ट्विट

First Published on: May 22, 2019 5:45 PM
Exit mobile version