दहावीचा विद्यार्थी खड्ड्यात पडून जखमी; पालिकेचा निष्काळजीपणा

दहावीचा विद्यार्थी खड्ड्यात पडून जखमी; पालिकेचा निष्काळजीपणा

अपघात

दहावीचा विद्यार्थी खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घाटकोपरमध्ये घडली आहे. दहावीची परिक्षा देण्यासाठी हा विद्यार्थी सायकल वरुन जात असताना खड्ड्यात पडून त्या खड्ड्यातील सळ्या डोळ्यात घुसल्याने त्याला दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा मुंबई महापालिकेचा निष्काळजीपणा समोर आला आहे.

नेमके काय घडले?

घाटकोपरमधील कातोडीपाडा रोड या ठिकाणी मलनिस:रण वाहिन्यांचे काम सुरु आहे. त्याकरता याठिकाणी मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. दरम्यान, विवेक घडशी हा विद्यार्थी शनिवारी सायकल घेऊन परिक्षा देण्यासाठी जात असताना त्याचा तोल गेला आणि तो खड्ड्यात पडला आणि खड्ड्यातील सळ्या या विद्यार्थ्याच्या डोळ्यात घुसल्या.

बॅरिकेटस नव्हते

हा रस्ता रहदारीचा असून देखील याठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले नव्हते, अपघात झाला आणि त्यानंतर याठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले. तसेच आता त्या रस्त्यावर स्लॅबही लावण्यात आले आहे. काम सुरु असताना सुरक्षेची काळजी घेणं, उपाययोजना करणं, बॅरिकेड्स लावणं हे महापालिकेचं प्राथमिक कर्तव्य आहे. परंतु, महापालिकेने ही काळजी घेतली नाही, परिणामी याचा फटका दहावीच्या विद्यार्थ्याला बसला आहे.


हेही वाचा – प्रियकरासोबत तरुणी बेडरुममध्ये होती आणि तेवढ्यात…


 

First Published on: March 9, 2020 4:11 PM
Exit mobile version