घरताज्या घडामोडीप्रियकरासोबत तरुणी बेडरुममध्ये होती आणि तेवढ्यात...

प्रियकरासोबत तरुणी बेडरुममध्ये होती आणि तेवढ्यात…

Subscribe

एका बेडरुममध्ये तरुणी आणि तरुण गप्पा मारत होते. त्या दरम्यान आई आल्याने घाबरलेल्या तरुणीने काय केले पहा.

आई – वडिलांच्या भितीने अनेक तरुण – तरुणी आपल्या प्रियकराला लपून छपून भेटत असतात. मात्र, हिच घटना ज्यावेळी घरातल्यांना कळते त्यावेळी मुलं कोणतही पाऊल उचलतात याची प्रचिती कुर्ल्यात पाहायला मिळाली आहे. कुल्यात एक वेगळीच घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीने आपल्या आईला बघताच घराच्या पहिल्या मजल्यावरुन उडी घेतली आहे. यामध्ये तरुणी जखमी झाली आहे.

नेमके काय घडले?

कुर्ला येथील बैल बाजार भागातील वीबी नगर येथे राहणारी एक १७ वर्षाची तरुणी आपल्या प्रियकरासोबत बेडरुममध्ये होती. त्या दरम्यान या मुलीची आई घरी आली. आता काय करायचे हे या मुलीला सुचले नाही. ती प्रचंड घाबरली होती. त्या घाबरलेल्या अवस्थेत तिने आपल्या प्रियकराला पळून जाण्याचा सल्ला दिला आणि स्वत: घराच्या खिडकीतून उडी घेतली. या घटनेमध्ये तरुणीच्या पायाचे हाड तुटले असून तिला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना ६ फेब्रुवारी घडल्याचे उघडकीस आले आहे.

- Advertisement -

प्रियकराला अटक

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी प्रियकर सुनील झेंडे (२०) याला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत. बलात्कार आणि अधिकार नसताना घरात प्रवेश केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.

…म्हणूनच प्रियकर पळून गेला

न्यूज एजन्सी पीटीआयनुसार; एका पोलिसांनी सांगितले की, तरुण आणि तरुणी बेडरुममध्ये गप्पा मारत होते. त्या दरम्यान, आई आल्याचे तरुणीला कळले. दरम्यान, तरुणीने प्रियकराला पळू जाण्यास सांगितले आणि स्वत: खिडकीतून उडी घेतली. यामध्ये तरुणीचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अमित ठाकरेंकडे कोणकोणती खाती? मनसेचे शॅडो कॅबिनेट जाहीर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -