अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींच्या लसीकरणाला प्रारंभ

अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींच्या लसीकरणाला प्रारंभ

अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींच्या लसीकरणाला प्रारंभ

मुंबई महापालिकेने २४ वार्डात अंथरुणाला खिळून असलेल्या व्यक्तींचे त्यांच्या घरी जाऊन लसीकरण करण्यास गुरुवारपासून सुरुवात केली आहे. त्यासाठी पालिका आरोग्य विभागाने, प्रत्येक वॉर्डात डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, रुग्णवाहिका व सपोर्टर स्टाफ यांचे एक पथक बनवले आहे. त्यामुळे आता अंथरुणात खिळून असलेल्या व्यक्तींना लस मिळण्याचा मार्ग मोकळा होऊन त्यांच्या नातेवाईकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. अंथरुणाला खिळून असलेल्या ४ हजार ४६६ व्यक्तींची नोंद झाल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईत १६ जूनपासून कोरोनावरील लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर, ज्येष्ठ नागरिक, तरुण, गरोदर आदींचे लसीकरण करण्यात आले आहे. मात्र अंथरुणात खिळून असलेल्या व्यक्तीना लसीकरण केंद्रापर्यंत जाणे – येणे कठीण असल्याने त्यांचे लसीकरण रखडले होते. मात्र मुंबई महापालिकेने त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला. सदर व्यक्तींचे लसीकरण प्रायोगिक तत्त्वावर अंधेरी / पूर्व व पश्चिम विभागातून सुरुवात करण्यात आली होती. या वॉर्डात ६०० हुन अधिक अंथरुणाला खिळून असलेल्या व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

असे करा रजिस्ट्रेशन

मुंबई पालिकेने अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी त्यांची योग्य माहिती पालिकेला देण्याचे आवाहन केले आहे. या माहितीसाठी पालिकेकडून एक ई-मेल आयडी देण्यात आलाय. covidvacc2bedridden@gmail.com या ई-मेल आयडीवर अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यास सांगितले आहे. नागरिकांचे नाव,वय,पत्ता,संपर्क क्रमांक यासारखी माहिती ई-मेल करण्यास सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – मुंबईत घरोघरी लसीकरण चाचणीला सुरुवात, अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांच्या लसीकरणासाठी असे करा रजिस्ट्रेशन

First Published on: August 5, 2021 9:01 PM
Exit mobile version