घरCORONA UPDATEमुंबईत घरोघरी लसीकरण चाचणीला सुरुवात, अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांच्या लसीकरणासाठी असे करा रजिस्ट्रेशन

मुंबईत घरोघरी लसीकरण चाचणीला सुरुवात, अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांच्या लसीकरणासाठी असे करा रजिस्ट्रेशन

Subscribe

मुंबईतील अंधेरी पूर्व, मरोळ, चकाला आणि इतर पश्चिम उपनगरात पूर्व प्रशासकीय प्रभागात सुरुवातीच्या टप्प्यात ही मोहिम राबवण्यात येणार

मुंबईत कोरोना विरोधी लसीकरणाला चांगलाच वेग आला आहे. राज्यात १ कोटी लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यात मुंबईचे नाव सर्वाधिक लसीकरण करणाऱ्या शहराच्या यादीत आहेत. सामान्य नागरिकांचे लसीकरण सुरळीत सुरु असताना आता मुंबईत अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांचे घरोघरी जाऊन लसीकरण मोहिमेच्या चाचणीला सुरुवात झाली आहे. घरोघरी जाऊन लसीकरण करणे ही मुंबई महापालिकेची महत्त्वकांक्षी योजना आहे. गेल्या अनेक दिवसांपासून घरोघरी लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात होते. शेवटी आजपासून मुंबई पालिकेच्या या महत्त्वकांक्षी योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. (door to door vaccination for bedridden citizens trial begins in Mumbai )

अंथरुणाला खिळलेल्या, उटता बसता न येणाऱ्या अशा नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी त्यांना त्यांच्या घरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व, मरोळ, चकाला आणि इतर पश्चिम उपनगरात पूर्व प्रशासकीय प्रभागात सुरुवातीच्या टप्प्यात ही मोहिम राबवण्यात येणार असल्याचे मुंबई पालिकेने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. आज,शुक्रवारी मुंबईतील जागेश्वरी येथील काही वृद्धांचे घरी जाऊन लसीकरण करण्यात आले. या लसीकरणात ७५वर्षांवरील लोकांचा सर्वाधिक सहभाग होता तर ३ नागरिक हे ९५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे होते.

- Advertisement -

असे करा रजिस्ट्रेशन

मुंबई पालिकेने अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी त्यांची योग्य माहिती पालिकेला देण्याचे आवाहन केले आहे. या माहितीसाठी पालिकेकडून एक ई-मेल आयडी देण्यात आलाय. [email protected] या ई-मेल आयडीवर अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यास सांगितले आहे. नागरिकांचे नाव,वय,पत्ता,संपर्क क्रमांक यासारखी माहिती ई-मेल करण्यास सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – Covaxin आणि Coveshield च्या Mixing dose संशोधनास मंजूरी, लवकरच ट्रायल

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -