मंत्रिमंडळ बैठकीत बांधकाम क्षेत्राविषयी महत्त्वाचा निर्णय! सामान्यांना फायदा होणार?

मंत्रिमंडळ बैठकीत बांधकाम क्षेत्राविषयी महत्त्वाचा निर्णय! सामान्यांना फायदा होणार?

आमदारांच्या स्थानिक विकास निधीत एक कोटींची वाढ

कोरोना काळात राज्यातल्या इतर क्षेत्रांना बसलेल्या फटक्याप्रमाणेच बांधकाम क्षेत्राला देखील मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये निर्मण झालेल्या मंदीसदृश्य परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बांधकाम व्यावसायिकांना वन टाईम प्रिमियममध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या बांधकाम क्षेत्रासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. यातून बांधकाम व्यावसायिकांना मिळणाऱ्या आर्थिक दिलाशाचा फायदा सामान्य ग्राहकांना देखील स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून मिळावा, असं देखील या निर्णयात म्हटल्याचं समजतंय. त्यामुळे येत्या काळात घरांवरची स्टॅम्प ड्युटी कमी होण्याची शक्यता आहे. प्रिमियममध्ये ५० टक्के सवलत घेणाऱ्या विकासकांनाच घरांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार असल्यामुळे त्याचा घरखरेदी करणाऱ्या सामान्य ग्राहकांना फायदा होणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.

मंत्रिमंडळात घेतलेले इतर महत्त्वपूर्ण निर्णय

First Published on: January 6, 2021 6:28 PM
Exit mobile version