लोकलमधील प्रवाशांवर दगडफेक; तरुणी जखमी

लोकलमधील प्रवाशांवर दगडफेक; तरुणी जखमी

प्रातिनिधिक

मध्य रेल्वेच्या कांजुरमार्ग ते विक्रोळी रेल्वे स्थानका दरम्यान अज्ञातांनी बुधवारी सकाळी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. या दगडफेकीत एक तरुणी जखमी झाली असून तिला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर सध्या उपचार सुरु आहे. तर गर्दीमुळे एका तरुणीचा श्वास कोंडला गेल्याने भोवळ आल्याने तिला देखील रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.

यामुळे घडली घटना

लोकलवर बाटल्या फेकण्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा ठाण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका लोकलवर दगड फेकल्यची घटना घडली आहे. या दगडफेकीमध्ये उभ्या असणाऱ्या एका तरुणीला दगड लागून ती जखमी झाली आहे. जखमी तरुणीला घाटकोपर स्थानकातून थेट राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. तर आज मध्य रेल्वेवर नेहमीप्रमाणे खोळंबा झाला होता. त्यचप्रमाणे आजचे रविवार प्रमाणे वेळापत्रक करण्यात आल्यामुळे मोठी गर्दी झाली होती. या गर्दीमध्ये एका तरुणीचा श्वास कोंडून तिला भोवळ आल्याने ती खाली कोसळली आहे. सध्या तिच्यावर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


हेही वाचा – लोकलमधून प्रवासी पडल्यानंतर रविवारचे वेळापत्रक रद्द


 

First Published on: July 3, 2019 2:54 PM
Exit mobile version