हिंदुस्थानी भाऊला मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

हिंदुस्थानी भाऊला मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

हिंदुस्थानी भाऊला मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षा घेण्याच्या मुद्द्यावरून आंदोलन भडकवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या युट्यूबर हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठकला मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. विकास पाठकने यापूर्वी वांदे दंडाधिकारी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता, मात्र त्याचा जामीन अर्ज दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळून लावला, यावेळी विकास पाठकने मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली. अखेर आज मुंबई सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्जाला मंजूरी दिली आहे. त्यामुळे त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षेऐवजी ऑनलाईन परीक्षा घ्याव्या या मागणीचे विनंती पत्र शालेय मंत्री वर्षा गायकवाड यांनी देण्यासाठी तो जात होता. याचा एक व्हिडीओ मेसेजही त्याने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला. तसेच विद्यार्थ्यांना यावेळी हजर राहण्याचे आवाहन केले. यावेळी सोशल मीडिया स्टार असलेल्या हिंदूस्थानी भाऊच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईच्या धारावी परिसरात हजारोंच्या संख्येने विद्यार्थी एकत्र जमा झाले.  विद्यार्थ्यांनी दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईनच व्हाव्या या मागणीसाठी आंदोलन केले. तर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर देखील मोठ्या संख्येने विद्यार्थी एकत्र जमा झाले. या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे मुंबई पोलिसांनी कारवाई करत युट्यूबर हिंदुस्तानी भाऊ अर्थात विकास पाठकला अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.


 

First Published on: February 17, 2022 3:44 PM
Exit mobile version