विद्यापीठाविरोधात विद्यार्थी राज्यपाल दरबारी

विद्यापीठाविरोधात विद्यार्थी राज्यपाल दरबारी

(फोटो प्रातिनिधिक आहे)

मुंबई:-मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराची अनेक प्रकरणे हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून याविरोधात आता विद्यार्थ्यांनी थेट राज्यपालांकडे दाद मागितली आहे. गेल्यावर्षी विद्यापीठाच्या काराभाराविरोधात उपोषणाला बसणार्‍या लॉ शाखेच्या अमेय मालशे या विद्यार्थ्यांनी थेट राज्यपालांकडे तक्रार करीत विद्यापीठाच्या कामकाजात सुधारणा आवश्यक असल्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता राज्यपाल विद्यापीठावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या अनागोंदी कारभाराविरोधात गेल्यावर्षी लॉ शाखेचा विद्यार्थी अमेय मालशे हा उपोषणावर बसला होता. त्यावेळी त्याने विद्यापीठाकडे आपल्या मागण्यांचे एक निवेदनदेखील दिले होते. मात्र या आंदोलनाला वर्ष उलटलं तरी अद्याप कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही विद्यापीठाने केली नसल्याचे समोर आले आहे. वर्षभरानंतरी अनेक विद्यार्थ्यांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे याविरोधात अमेयने आता राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्याकडे धाव घेतली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा भवनासमोर माझ्या व माझ्यासारख्या मुंबई विद्यापीठाच्या ११००० विद्यार्थ्यांच्या निकालासाठी आमरण उपोषण करण्याची दुर्दैवी वेळ माझ्यावर आली होती.

त्यायोगे अनेक सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी एक सर्वसामान्य विद्यार्थी या नात्याने विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविरूध्द आम्हा विद्यार्थ्यांच्या हक्काचा लढा देण्यासाठी देवाच्या कृपेने बळ एकवटून सदरच्या लढ्यात यशस्वी झालो. त्यानंतर एक वर्षाच्या कालावधीत संपर्कात आलेल्या अनेक विद्यार्थी मित्रांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि त्यांचे निकाल मिळवण्यास मदत केली. तर या सगळ्या नंतर तरी विद्यापीठाचा कारभार सुधारेल अशा आशेवर होतो, पण आज वर्षभरानंतर पुन्हा विद्यापीठातील परीक्षा भवनाचा कारभार “जैसे थे”च असल्याने मनात संतापजनक असल्याची खंत त्याने या पत्रात केली आहे.

First Published on: October 12, 2018 1:39 AM
Exit mobile version